अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाची निवड २०१८ पासूनच बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत धर्मदाय उपायुक्त एम. डी. गाडे यांनी तीन महिन्यांच्या आत निरीक्षकांनी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे सुमोटो आदेश गुरुवारी (ता. ४) दिले. नवीन संचालक मंडळ निवडून येईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ काळजीवाहू म्हणून काम पाहिल, असेही आदेशात म्हटले आहे. २०२२ ते २५ या कार्यकाळासाठी नवीन संचालक मंडळ निवडून आले होते. (Jalgaon Take election of Khandesh Education Board within 3 months Orders of Deputy Commissioner of Charities)
या नवीन कार्यकारिणीने चेंज रिपोर्ट सादर केला होता. १६ डिसेंबर २०१८ ला सर्वसाधारण सभेने निवडणुकीबाबत काही नियम बनविले होते आणि सर्वसाधारण सभेला संस्थेचे सर्वोच्च अधिकार आहेत. नियमांच्या बदलाबाबत अपील प्रलंबित असल्यामुळे २०१८ ते २०२१ कालावधीसाठी झालेली निवडणूक नियमाप्रमाणे झाली नाही, म्हणून ते संचालक मंडळ बेकायदेशीर आहे,
तसेच २०१८ पासूनचे संचालक मंडळच कायदेशीर नसल्याने निवडणूक कोणी घ्यावी, असा प्रश्न निर्माण होतो, म्हणून धर्मदाय उपायुक्त एम. डी. गाडे यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकांनी तीन महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. (latest marathi news)
तसेच विद्यमान संचालक मंडळाला काळजीवाहू म्हणून काम पाहण्याचे व पूर्वपरवानगी घेऊन आर्थिक व्यवहार करण्याचेही अधिकार बहाल केले आहेत. धर्मदाय उपायुक्तांचे आदेश अद्यापपर्यंत संस्थेला प्राप्त झाले नसून ते आल्यावर वकिलांशी चर्चा व कायदेशीर बाबी पडताळून वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल करण्यात येईल, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.