Teacher Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) शांततेत मतदान झाले. सकाळपासूनच शिक्षक मतदारांनी उत्साहात मतदान केले. जळगाव शहरात एकाच शाळेत तीन मतदान केंद्रे असल्याने मतदारांची गर्दी झाली होती. जिल्ह्यात निवडणुकीसाठी १३ हजार १२२ शिक्षक मतदार होते. त्यात ९ हजार ६७३ पुरुष, तर ३ हजार ४४९ स्त्री मतदार होते. मतदानासाठी १२० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. (Teachers Constituency Election 95 percent voting in district )
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर याठिकाणी मतदान केंद्रे होती. कमी मतदारसंख्या असल्याने तालुक्यांच्या ठिकाणी गर्दी जादा प्रमाणात झाली नाही. मात्र, मतदान केंद्राबाहेर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची समर्थकांची गर्दी होती. (latest marathi news)
कोणी मतदार आला की त्याला ‘भाऊ, तात्या, अण्णा, दादा’, असे संबोधून नमस्कार करताना समर्थक दिसत होते. जळगाव शहरातील आर. आर. शाळेतील मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी विविध ठिकाणी बूथ लावून मतदारांना यादीतील नाव शोधून देत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी शहरातील मतदान केंद्राना भेटी देऊन पाहणी केली.
वेळनुसार झालेले मतदान असे
सकाळी ७ ते ११ : २०.५ टक्के
सकाळी ७ ते दुपारी १ : ४९.७५ टक्के
सकाळी ७ ते दुपारी ३ : ६१.१३ टक्के
सकाळी ७ ते सायंकाळी ५ : ८३.६१ टक्के
सकाळी ७ ते सायंकाळी ६ : ९५.२६ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.