Chief of Shiv Sena Thackeray Party Sanjay Sawant met former Minister Gulabrao Deokar and Valmik Patil of NCP Sharad Chandra Pawar Party. esakal
जळगाव

Jalgaon News : ठाकरे गटाकडून आघाडी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी; पक्षासह बाहेरच्या उमेदवारांची चाचपणी

Jalgaon : जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीचे सत्र सुरू केले आहे. पक्षातील इच्छुकांसह बाहेरच्या उमेदवाराबाबतही चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Jalgaon Thackeray group meeting with leading office bearers)

त्यामुळे आता विरोधी पक्षातर्फे त्यांच्या विरोधात कोण लढत देणार याकडे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे या गटातर्फे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सूकता आहे. पक्षातर्फे कुलभूषण पाटील व पक्षात नुकत्याच प्रवेश केलेल्या अमळनेर येथील ॲड. ललीता पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे.

बाहेरच्या उमेदवाराची चर्चा

पक्षातील दोन इच्छुक उमेदवारांसह विरोधी पक्षातील मोठा नेता उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही नावे पक्षातर्फे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

आघाडीतील नेत्यांशी चर्चा

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगावात दाखल झाले होते. उमेदवारी निश्‍चिीतीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आघाडीतील पक्षाच्या नेत्यांशीही चर्चा करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी प्रथम माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांची भेट घेतली. (latest marathi news)

यावेळी त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्‍यामकांत सोनवणे, पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, इच्छुक उमेदवार कुलभूषण पाटील तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सहकार आघाडीचे अध्यक्ष वाल्मिक पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर सावंत यांनी अमळनेर येथे कॉंग्रेसचे डॉ.अनिल पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

यावेळी त्यांच्या समवेत इच्छुक उमेदवार ॲड. ललीता पाटील उपस्थित होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पारोळा येथील माजी आमदार डॉ. सतीश पाटील तसेच इतर नेत्यांची भेट घेतली. यावेळी आघाडीतील तीन पक्षांनी एकत्रित लढण्याचे निश्‍चीत करून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा जिंकण्याचा निर्धार केला.

पक्षप्रमुख उमेदवार ठरविणार

जळगाव लोकसभेच्या उमेदवाराबात अद्याप निश्‍चिती झालेली नाही. मात्र पक्षातर्फे दोन उमेदवार इच्छुक आहेत. त्याबाबत निर्णय होणार आहे. याशिवाय बाहेरच्या पक्षातील मोठा नेताही इच्छुक आहे. परंतु उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT