police  esakal
जळगाव

Jalgaon News : पोलिस दलाची गुन्हे शाखा ‘आऊटरवर’; डिटेक्शनसाठी कर्मचाऱ्यांची आयात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दलाची गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात ‘एलसीबी’ आजही नाशिक विभागात डिटेक्शनसाठी नावाजलेली शाखा आहे. असे असताना काही दिवसांपासून ही शाखाच पूर्णतः आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात लावून वरिष्ठांनी आऊटरला फेकल्याने कर्मचारी दानाफान झाले आहेत. परिणामी, गुन्हे डिटेक्शनसाठी बाहेरील जिल्ह्यातील पोलिस ‘इम्पोर्ट’ करण्याची वेळ जिल्‍हा पोलिस दलावर आली आहे. ( time has come for district police force to import police from outside district for crime detection)

साडेपाच लाख लोकसंख्येचे जळगाव शहर आणि उर्वरित ४० लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ३५ पोलिस ठाण्यांसह आठ उपविभागीय अधिकारी आहेत. जिल्ह्यात घडणारे मोठे व गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे महत्त्वाचे काम पोलिस अधीक्षकांची शाखा असलेली गुन्हे शाखा करते.

मात्र, जळगावात अपघात घडला तिथे, दगडफेक झाली तिथे, मंत्र्यांच्या दौऱ्याच्या कामात गुन्हे शाखा जुपली असून, नेहमी ‘मेन स्ट्रिम’मध्ये असणारी जिल्हा पोलिस दलाची स्थानिक गुन्हे शाखा थेट बाजूला सारण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला साईड लाईन करणे कुठल्याही पोलिस अधीक्षकांसाठी आणि त्या जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असताना, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा धोका पत्करून पोलिस ठाण्यांच्या पातळीवर गुन्हे उघडकीस आणण्यावर अधिक भर दिल्याचे काही घटनांमधून अधोरेखीत होत आहे.

‘शापीत’ गुन्हे शाखा

डी. डी. गवारे यांच्या कार्यकाळात तांत्रिक पुरावे, गुन्हे उघडकीस आणण्याचे पोलिसांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊन अगदी ८५ कर्मचाऱ्यांवर नाशिक रेंजमध्ये गुन्हे शाखा अव्वल राहिली. नंतर प्रभाकर रायते गुन्हे शाखेचे प्रभारी असताना, हाच रेशो कायम होता. मात्र, अशोक सादरे यांचे कॉल रेकॉर्डिंग प्रकरण घडले. सादरेंच्या मृत्यूनंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि गुन्हे शाखा निरीक्षकांवर गुन्हे दाखल झाल्याने हे प्रकरण देशभर गाजले.

त्यावर राजेशसिंह चंदेल या खमक्या अधिकाऱ्याने नियंत्रण मिळवले. सुनील कुराडे, बापू रोहम यांचाही कार्यकाळ चांगला गेला. ज्युनिअर असताना, किरणकुमार बकालेंनी धुरा सांभाळत बऱ्यापैकी गुन्हे शाखा गाजवली. मात्र, एका कॉल रेकॉर्डिंगने त्यांचीही सद्दी संपुष्टात येऊन आयुष्यभरासाठी खात्यातून बाहेर जावे लागले.

आजअखेर किशन नजन पाटील यांनी अनुभवातून गुन्हे शाखेची पताका उंचीवर नेत एमपीडीए, हद्दपारी आणि उघड गुन्ह्यांचे प्रमाण वाढवून रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. ३१ मेस ते निवृत्त होत असून, शापीत असलेल्या गुन्हे शाखेचा पदभार घेण्यासाठी खूप स्पर्धा असली, तरी अधिकाऱ्यांमध्ये भिती कायम आहे.

कर्मचाऱ्यांचा जत्था टिकू देईना

पोलिस दलात कधी नव्हे, इतकी राजकीय ढवळाढवळ झाली आहे. जिल्ह्यातील कोणत्या पोलिस ठाण्यात कोण प्रभारी असेल?, कलेक्शन कोणता कर्मचारी करेल, याचे निर्णय राजकीय मंडळी घेऊ लागली आहे. जामनेर गटाचाच कर्मचारी कलेक्शनवर राहील, असा अट्टाहास सर्वच पोलिस ठाण्यासाठी असतो. तर गुन्हे शाखेत ८५ ते १२० (फिल्डवर्क टेबलसह) कर्मचाऱ्यांची ‘स्ट्रेंग्थ’ असताना, सर्वाधिक कर्मचारी जामनेरच्या वशिल्यानेच आले आहेत.

बोटावर मोजण्याइतके पाळधी व अमळनेरच्या दर्ग्यावरून प्रसाद घेऊन आलेली मंडळीही रांगेतच आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, पारंपरिक खबऱ्यांचे जाळे (ह्यूमन नेटवर्कीग), गुन्हेगारांची माहिती, असे कुठलेही कसब या कर्मचाऱ्यांमध्ये नसताना केवळ वशिला घेऊन गुन्हे शाखा भरली गेली आहे.

संपूर्ण गुन्हे शाखा रिकामी

प्रभारी अधिकारी किशन नजन पाटील शुक्रवारी (ता. ३१) निवृत्त होत आहे. दुय्यम अधिकारी गणेश चौबे, वाघमारे, दोघांचेही बदलीचे अर्ज प्रतिक्षेत आहेत. सहाय्यक निरीक्षक मोरे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. यासोबतच कार्यकाळ पूर्ण होणारे ३० कर्मचारी बदलीस पात्र ठरले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांना मी एलसीबीत आहे इतकेच माहितीय. सर्वसाधारण बदल्यांच्या आधीच बांशिग बांधून काहींनी रांग लावून टोकन मिळविले आहे.

जळगावचा दबदबा खल्लास

कधी काळी राज्यात गुन्हे प्रकटीकरणात अव्वल असलेली जळगाव गुन्हे शाखेची पुरती रयाच गेली आहे. कर्मचारी म्हणून राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा झाल्याने कुठलीच बाब गुन्हे शाखेत गुप्त राखली जात नाही. प्रभारीपासून ते एसपीपर्यंत कुणाचा केव्हा गेम लावायचा, याचा प्लॅन हे कर्मचारी आखत असतात. थेट डीवायएसपींच्या बदला करणारा एक मंत्र्यांचा बारावी पास पीए महिन्याला आढावा घेण्यासाठी येत असतो. कुणाची एमपीडीए, कुणाची हद्दपारी रद्द करायची, यासाठी त्याचे प्रयत्न असतात.

कर्मचारी ‘इम्पोर्ट’ करण्याची वेळ

दहीवद (ता. चाळीसगाव) येथील दरेाड्याचा गुन्हा देान दिवसांपूर्वीच उघडकीस आला. या गुन्ह्यात नाशिक गुन्हे शाखेतील मनोहर शिंदे यास इम्पोर्ट केल्यावर मध्य प्रदेशातून दरोडखोर अटक करण्यात आले. संपूर्ण गुन्हे शाखेत आणि साडेतीन हजारांच्या पोलिस दलात एकही कर्मचारी हा गुन्हा उघडकीस आणण्यास सक्षम नसावा किंवा जळगावची गुन्हे शाखा आता नावालाच शिल्लक असल्याची चर्चा पोलिस दलात होऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT