Jalgaon News : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे प्रथमच राज्यातील महाविद्यालय व रुग्णालयांची महिनाभरातील कामगिरी पाहून रँकिंग देण्यात आले.
यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (जीएमसी) गोल्ड या वर्गवारीत स्थान मिळाले.
राज्यातून पाचवा क्रमांक मिळाला असून, हे महाविद्यालयाचे सांघिक यश असल्याची प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.(Jalgaon to GMC 5th ranking from state Adhishthata Thakur Success achieved on strength of team performance Jalgaon News)
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच असे रँकिंग करण्यात आले आहे. विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी सर्व महाविद्यालयांतून माहिती मागविली होती.
त्यातून गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ अशा वर्गवारीतून राज्यातील १९ महाविद्यालयांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील डॉक्टर्स, प्राध्यापक, कर्मचारी यांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या बायोमेट्रिक हजेरीतील उपस्थितीचे प्रमाण तपासण्यात आले.
रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या मदतीने मोठे व लहान शस्त्रक्रिया किती झाल्यात याबाबतची माहिती समाधानकारक आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांना देण्यात आलेल्या लाभाबाबत जळगावचे सादरीकरण सर्वोत्तम ठरले. जळगाव जिल्ह्यातील अनेक रुग्णांना लाखो रुपयाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
इ-औषधी पोर्टलवर किती औषधी नोंदणी केली, या निकषात जळगाव जीएमसीने रुग्णांच्या फायद्यासाठी त्याकरिता आलेला निधी योग्य पद्धतीने दैनंदिन रुग्णांच्या अपेक्षेनुसार खर्च केला हे मापन पाहिले गेले.
जळगाव जीएमसीला केवळ सहा वर्षे झाली असूनही अल्पावधीतच गोल्ड कॅटेगरीमध्ये स्थानासह रँकिंग मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. जळगाव जीएमसीतून माहिती देण्यासाठी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विलास मालकर, डॉ. डॅनियल साझी यांनी समन्वयन केले. दरम्यान, रुग्णालयात चांगल्या सुविधा व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळत असून, ग्रामीण भागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.