Police Transfer esakal
जळगाव

Jalgaon Police Transfer : पोलिस बदल्यांनी ‘कही खुशी कही गम’; सर्वसाधारण बदल्यांसह विनंती बदल्या फ्लॅश

Police Transfer : जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत ५१ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे गॅझेट सोमवारी (ता. २२) रात्री प्रसारित झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Police Transfer : जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत ५१ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे गॅझेट सोमवारी (ता. २२) रात्री प्रसारित झाले. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ६०९ कर्मचाऱ्यांपाठोपाठ पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी विनंती बदल्यांचे आदेशही पारित केले असून, बदली आदेशानंतर सुधारित अर्ज घेऊन अनेकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात रांगा लावल्या होत्या. मनाप्रमाणे बदली न झालेल्यांचा अजूनही धावा सुरूच आहे. (Transfers were requested with completion of tenure in police force )

पोलिस दलामध्ये कार्यकाळ पूर्ण झालेल्यांसह विनंती बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर सोमवारी पुन्हा ५१ जणांच्या बदलीचे नवे आदेश काढण्यात येऊन तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस मुख्यालयातील संघपाल तायडे व भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी राहुल महाजन यांची ‘एलसीबी’त वर्णी लागली आहे, तर मुख्यालयातील पाच जणांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. मुख्यालयातून नऊ कर्मचाऱ्यांना वेगवेगळे पोलिस ठाणे मिळाले आहे. सायबर पोलिस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांना शहर वाहतूक शाखेत स्थान मिळाले आहे.

काहींची मंत्र्यांकडे धाव

पोलिस दलात कोरोना काळापासून सर्वसाधारण बदल्या प्रलंबित होत्या. कार्यकाळ पूर्ण झालेले कर्मचारी त्या-त्या ठिकाणीच कामे करीत होते. कार्यकाळ पूर्ण होऊनही शहरातून तालुक्याच्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागात जाण्यास सर्वच कर्मचाऱ्यांची नकार घंटा होती. बदली आदेश प्रसारित झाल्याबरोबर त्या-त्या पोलिस निरीक्षकांना संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून बदली होऊन येणाऱ्यांना हजर करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या. परिणामी, बदली होताच जवळच्याच साहेबांनी सोडून दिल्याने नव्या जागी हजर राहून काहींनी पुन्हा विनंती अर्ज केले आहेत. तर, काहींनी आमदार खासदारांसह मंत्र्यांकडे धाव घेतली आहे. (latest marathi news)

मनाप्रमाणे बदलीसाठी तीच कारणे समोर

आईवडिल वयोवृद्ध आहेत. आईचे आजारपणाची देखभाल करावी लागते. मुलांचे शाळा प्रवेश झाले आहेत. मुलं अमूक एक महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पती-पत्नी दोघे नोकरीत असल्याने ताटातूट होते, अशी विविध पारंपरिक कारणे घेऊन अनेकांनी अर्जांचा सपाटा लावला आहे. कार्यकाळ पूर्ण होऊनही तेच-ते कारणे वारंवार देत अनेकांनी बस्तान मांडल्याचेही यामुळे समोर आले आहे.

आजारपणाचेही कारण

काहींना आईवडिल, काहींना पत्नीचे आजारपण, तर काही स्वतःच व्याधींनी ग्रस्त असल्याने मोठमोठ्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट, उपचारांचे कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडून झालेल्या बंदल्यांमध्येही मनपसंत ठिकाणाची मागणी केलीय, तर काहींनी १ वर्षे स्थगितीची मागणी लावून धरली. आजारपण गंभीर नसेल आणि उपचार होऊ शकत असलेल्या आजारपणांत जिल्हांतर्गत बदली कुठेच अडचणीची ठरत नसल्याचे अनेकांना पोलिस अधीक्षकांनी डॉक्टरच्या भाषेत समजावून सांगितले.

बदल्यांचीही अदल-बदल

महत्‌ प्रयत्नातून गुन्हे शाखेत आलेल्या एका कर्मचाऱ्यास शॉर्ट टर्म बदलीचा लाभ घेता आला. एक गुन्हा उघडकीस आणल्याची बातमी छापून आली अन्‌ लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेतून या कर्मचाऱ्याला दुसरीकडे बदली झाल्याने जावे लागले. या बदल्यांमध्ये यंदा खूप गंमती जमती समोर आल्या. पाचेारातील एका कर्मचाऱ्याच्या समर्थकांनी बदली टळावी, यासाठी चक्क व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला होता, तर एकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारस आणली. या दोघांना नेमके इंजेक्शन डॉ. रेड्डींनी दिले. एका महाभागने चक्क तीन मंत्र्यांची शिफारस मिळवून दबाव आणला. हळूच मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला ही बाब कळल्याने त्याने चक्क बदली होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT