transformer in the open on city traffic routes. esakal
जळगाव

Jalgaon News : प्रमुख रहदारीच्या भागातील रोहित्र उघड्यावरच; पारोळा शहरातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वीज महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयातील नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील प्रमुख रहदारीच्या भागातील रस्त्यालगतचे रोहित्र उघड्यावरच आहे. त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाला आहे. म्हणून महावितरणच्या या गलथान कारभाराबाबत शहरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पारोळा शहराचा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरण कंपनीकडून तीन फिडरच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. (Jalgaon transformer in main traffic areas is open in parola city )

दरम्यान, महावितरणकडून रस्त्याच्या कडेला व रहदारीच्या भागात रोहित्र बसविण्यात आलेली आहेत. मात्र, अनेक रोहित उघडेच असल्याने लगतच्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताच धोका निर्माण झालेला आहे. म्हणून उघडे रोहित्रे तातडीने बंदिस्त करण्याची मागणी शहरवासीयांसह विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. दरम्यान, महावितरण कंपनीमार्फत नुकतीच मॉन्सूनपूर्व उपाययोजना म्हणून झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली.

त्यादरम्यान लाईनमनसह अधिकाऱ्यांनीदेखील संबंधित भागाची पाहणी केली. त्यावेळी उघडे असलेले रोहित्रे अधिकाऱ्यांना दिसले नाही का, असा प्रश्नदेखील यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. वीज ग्राहकांकडून वसुलीबाबत आग्रह केला जातो. मात्र, विजेच्या समस्या सोडविण्याबाबत महावितरणकडून होत असलेली दिरंगाईकडे वरिष्ठांकडूनही दुर्लक्ष करण्यात येते.

शहरातील बालाजी पार्क, व्यंकटेशनगरजवळील अमळनेर रस्त्यावरील रोहित्र आजदेखील उघडेच आहेत. या रोहित्राच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे एखाद्या नजरचुकीने किंवा रोहित्र झाकण्यासाठी तो येऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील सर्व रोहित्रांची पाहणी करून तत्काळ ती बंदीस्त करावीत, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. (latest marathi news)

विजेच्या लपंडावाने हिरमोड

अनेक दिवसांपासून अचानकपणे दिवसभरातून सुमारे दहा ते बारा वेळा पूर्वसूचना न देता पारोळा शहरातील वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे विजेवर चालणारे उपकरण तत्काळ बंद पडतात. अनेक व्यावसायिकांची कामेदेखील वेळेवर होत नसल्याने त्यांचीदेखील नाराजी दिसून येते. त्यातच महिलांना विजेशिवाय घरातील कामे उरकतच नाहीत. त्यामुळे त्यांनीदेखील वीज महावितरण कंपनीच्या नियोजन शून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

''पारोळा शहरात तब्बल २०१ रोहित्रे आहेत. अपूर्ण कर्मचारीसंख्या असतानादेखील शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीची यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यातच संबंधित लाईनमनच्या माध्यमातून रोहित्र पाहणी करून ते तत्काळ बंदिस्त करण्यात येतील.''- गौतम मोरे, शहर अभियंता, वीज महावितरण, पारोळा.

अन्यथा ‘वंचित’ची ‘गांधीगिरी’

पारोळा शहरातील अनेक रोहित्रे उघड्यावरच आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण होण्याची भीती आहे. म्हणून येत्या आठवड्याभरात वीज महावितरणच्या यंत्रणेने शहरासह तालुक्यातील उघडे असलेले रोहित्र बंद करण्यात यावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी ‘गांधीगिरी’च्या माध्यमातून उघड्यावर असलेले रोहित्रे बंद करण्यासाठी वीज महावितरण कंपनीला सहकार्य करेल, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम पवार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT