Accidental tanker on the highway esakal
जळगाव

Jalgaon Accident News: महामार्गावरील उभ्या ट्रकवर भरधाव टँकर आदळून दोन ठार! वरणगावजवळील घटना; गुन्हा दाखल

Jalgaon News : नादुरुस्त ट्रकला बघण्यासाठी चालक नदीम नसीम खान (रा. नागपूर) ट्रक खाली उतरला. त्याचवेळी मागून १२ चाकी टँकर (एमएच ४१, एयू ४६४६)चालक कुंभकरण (रा. अमेठी, उत्तर प्रदेश) याने मागून ट्रकला जोरदार धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव (ता. भुसावळ) : शहरालगत नवीन राष्ट्रीय महामार्गावर पहिलवान ढाब्याजवळ नादुरुस्त ट्रकवर मागून भरधाव टँकर आदळल्याने दोन्ही वाहनचालक ठार झाले. ही घटना गुरुवारी (ता. ११) रात्री दीडच्या सुमारास घडली. (Jalgaon Two killed when tanker collided with standing truck)

भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारा ट्रक (सीजी ०४, जेडी ०५१७) नादुरुस्त झाल्याने गुरुवारी रात्री महामार्गावर उभा होता. नादुरुस्त ट्रकला बघण्यासाठी चालक नदीम नसीम खान (रा. नागपूर) ट्रक खाली उतरला. त्याचवेळी मागून १२ चाकी टँकर (एमएच ४१, एयू ४६४६)चालक कुंभकरण (रा. अमेठी, उत्तर प्रदेश) याने मागून ट्रकला जोरदार धडक दिली.

या धडकेत टँकरच्या केबिनचा अक्षरश: चुराडा झाला असून, चालक कुंभकरण अडकला होता, तर नादुरुस्त ट्रकखाली असलेला नदीम नसीम खान दाबला गेला. दोघांना बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत पोलिस कर्मचारी सुकराम सावकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत टँकरचालक कुंभकरण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वरणगाव पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT