Vaishali Suryavanshi giving a statement and warning of protest to Municipal Commissioner Mangesh Deore regarding the plight of roads and lack of civic facilities. esakal
जळगाव

Jalgaon News: पाचोऱ्यात रस्तेप्रश्‍नी UBT चा ‘एल्गार’! पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; सुविधांसाठी सेना स्टाईल आंदोलनाचा इशारा

Jalgaon News : ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वसाहतीत रहिवाशांना घरापर्यंत जाणे कठीण झाले असून, मुले, महिला, वृद्धांना प्रचंड मनस्ताप होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील शहर व शहरालगतच्या वसाहतीतील दुर्दशा झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती तसेच नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला असून, वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शिवसैनिकांनी संतप्त भावनेने जाब विचारत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना निवेदन दिले. रस्त्यांची दुरुस्ती व नागरी सुविधांची पूर्तता त्वरित न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Jalgaon UBT Elgar road problem in Pachora)

निवेदनाचा आशय असा की, शहरातील व वसाहतीतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात व जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. रस्ते सुरक्षितता जीवन मरणाचा प्रश्न व आपला प्रवास सुखाचा होवो, अशी घोषवाक्य लिहिलेल्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने पालिकेचे हसू होत आहे.

अपघातामुळे अनेकांना अपंगत्व येत असून, जीवित हानीची भीती वाढली आहे. लोकप्रतिनिधी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून फिरत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वसाहतीत रहिवाशांना घरापर्यंत जाणे कठीण झाले असून, मुले, महिला, वृद्धांना प्रचंड मनस्ताप होत आहे.

अनेक ठिकाणी डबकी साचली असून, डास, चिलटे, दुर्गंधी यांचा उपद्रव वाढून आरोग्याची भीतीही निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केल्याचा व सत्ताधारी आव आणतात. परंतु रस्त्यांची कालमर्यादा संपण्याअगोदरच त्यांची दुर्दशा झाली आहे. (latest marathi news)

विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी या रस्त्यांकडे पाहावे व आत्मचिंतन करावे. आता उबाठा हे खपवून घेणार नाही, असा इशारा देऊन या रस्त्यांची त्वरित करून दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्याची कामे करताना तेथे त्याची कालमर्यादा व ठेकेदाराचे नाव यासंबंधीचा माहिती फलक लावावा. नागरी सुविधांबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी; अन्यथा पालिका प्रशासनाविरुद्ध शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनासोबत शहरातील दुर्दशा झालेल्या ५० रस्त्यांचे व घाणीचे फोटो पुरविण्यात आले आहेत. निवेदनावर वैशाली सूर्यवंशी, अरुण पाटील, उद्धव मराठे, ॲड. अभय पाटील, शरद पाटील, संदीप जैन, अनिल सावंत, ॲड. दीपक पाटील, शशी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT