Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी 2 तासांत अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयिताला वैद्यकीय तपासणीसाठी न्यायालयाच्या परवानगीने गुरुवारी (ता. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. पोलिसांची नजर चुकवून तो रुग्णालयातून फरारी झाला होता. मात्र, दोन तासांनी त्याला एलसीबी कर्मचाऱ्यांनी शिताफीने पकडून पुन्हा जिल्हा कारागृहात जमा केले. (uncle arrested by police who took nine year old niece to farm and molested)

सॅन्डल घेण्याच्या बहाण्याने सख्या मामाने नऊ वर्षीय भाचीला शेतात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना ३० जूनला चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली होती. चिमुकलीने मामाच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला व जवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना हा प्रकार सांगितला. परिसरातील ग्रामस्थांनी नराधम मामाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात समाधान ऊर्फ सोमा अभिमान भिल्ल (वय २४) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. समाधान भिल याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानुसार तो जळगाव जिल्हा कारागृहात होता. दरम्यान, समाधान भील याचे वय निश्चितीसाठी ताबा मिळावा, म्हणून मेहुणबारे पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरून न्यायालयाने जिल्हा कारागृहाला वय निश्चितीच्या वैद्यकीय तपासणीसाठी समाधान भिल याचा ताबा देण्याबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार मेहुणबाऱ्याचे हवालदार अरुण पाटील व राकेश काळे यांनी त्याला दुपारी तीनया सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला आणले होते. रुग्णालयात पोलिस कागदपत्रांची कार्यवाही करीत असताना, तेथून समाधान भिल याने पळ काढला. त्यामुळे पोलिस गांगरून गेले. मात्र, त्याचा शोध सुरू केला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कळविले. सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस नाईक सुधाकर अंभोरे यांच्या नजरेस तो पडला.

संशयित समाधान भिल भजे गल्लीत एका बंद रिक्षात बसत होता. त्याचवेळी अंभोरे यांनी त्याला झडप घालून पकडले. त्याला एलसीबीच्या कार्यालयात आणले. तेथे हवालदार अरुण पाटील व राकेश काळे यांनी त्याला ओळखले. त्यांच्यासह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी समाधान भिल याला जिल्हा कारागृहात जमा केले. एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, नाईक, किरण चौधरी यांनी ही कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT