kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University esakal
जळगाव

Jalgaon NMU News: वंचितांना पदवीधर, पदव्युत्तर होण्याची संधी! ‘उमवि’ आजीवन अध्ययन विभागातर्फे प्रवेश; 15 पर्यंत मुदतवाढ

Educational News : सर्व शिक्षणक्रमांची संरचना आणि अंमलबजावणी प्रक्रिया नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार सत्र पद्धतीने आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाद्वारे प्रमाणपत्र, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे. (Admission through NMU Department of Lifelong Studies Extension till 15)

तळागाळातील व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अथवा नोकरी करीत असल्यामुळे, घराची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे पदवीधर होता आले नाही, असे विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व व्यवसाय करणाऱ्या महिला, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्तींसाठी बाहेरून शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने उचललेले एक अभिनव पाऊल आहे.

सर्व शिक्षणक्रमांची संरचना आणि अंमलबजावणी प्रक्रिया नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार सत्र पद्धतीने आहे. आजीवन विभाग हा विद्यापीठातीलल वेगळेपण जोपासणारा विभाग आहे. या विभागातर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संरक्षण व सामरिक शास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. करता येईल आणि एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.कॉम. हे अभ्यासक्रम करता येणार आहेत. (latest marathi news)

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सेमिस्टर पद्धती असल्याने वर्षातून दोन वेळा परीक्षांचे आयोजन, प्रवेश ते पदवी प्रदान अंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अंमलबजावणी प्रक्रिया, प्रवेशीत विद्यार्थ्यांना विषयानुसार स्वयंअध्ययन साहित्य ई-स्वरूपात उपलब्ध, विविध स्पर्धा परीक्षा, पीएच.डी., नोकरीसाठी पदवीस मान्यता आणि समान संधी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी संमंत्रण सत्रांचे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने (Councelling Session in Hybrid Mode) आयोजन केले जाईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२५७४९५/२२५८४९६ यावर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT