PMKSY Yojana esakal
जळगाव

PMKSY Yojana : पाडळसरे प्रकल्पाचा ‘पीएम-केएसवाय’त समावेश करणार : केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील

PMKSY Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (पीएमकेएसवाय-एआयपीबी) या योजनेत होण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी मंत्री अनिल पाटील दिल्लीत दाखल झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

PMKSY Yojana : तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत असताना आता लवकरच या प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत (पीएम-केएसवाय) समावेश करण्याची ग्वाही तथा संकेत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी मंत्री अनिल पाटील व नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत दिले. (Union Jal Shakti Minister Patil statement on Padalse project to be included in PMKSY )

या बैठकीमुळे धरणाच्या प्रगतीचा मार्ग आता सुकर झाला आहे. निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (पीएमकेएसवाय-एआयपीबी) या योजनेत होण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी मंत्री अनिल पाटील दिल्लीत दाखल झाले होते. सुरवातीला एक दिवस आधी सी. आर. पाटील हे केंद्रीय जलशक्ती मंत्री झाल्याबद्दल अनिल पाटील व नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. त्यानंतर त्यांच्याच विनंतीनुसार दुसऱ्या दिवशी पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली.

या वेळी मंत्री अनिल पाटील यांनी धरणाचा इतिहास मांडताना या प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने (सीडबल्यूसी) ची मान्यता देत १२ मार्च २०२४ ला इन्व्हेसमेंट क्लिअरन्स दिलेले असून, या प्रकल्पाच्या टप्पा-१ चा समावेश पीएमकेएसवाय-एआयपीबी या योजनेत होण्याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली असल्याचे सांगितले तर स्मिता वाघ यांनी सांगितले, की हे धरण अवर्षणप्रवण क्षेत्रात असून, महाराष्ट्र शासनाने यास चौथी सुप्रमा देऊन केंद्राचा मार्ग सुकर केला आहे. तसेच केंद्र शासनाने सीडब्लूसीची मान्यता दिली आहे. आता केंद्रीय योजनेत धरणाचा समावेश होण्याची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे सांगितले. (latest marathi news)

बैठकीत सकारात्मक चर्चा

मंत्री सी. आर. पाटील यांच्यासोबत याविषयी सकारात्मक चर्चा झाली. त्यावर मंत्री सी. आर. पाटील यांनी निम्न तापी (पाडळसे) प्रकल्पाबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून पीएमकेएसवाय-एआयपीबी या योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत लवकरच अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात निर्देश विभागाच्या सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिलेत.

या सकारात्मक भूमिकेबद्दल मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी सी. आर. पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले. या बैठकीस जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव देबाश्री मुखर्जी, पाणी पुरवठा-स्वच्छता विभाग सचिव विनी महाजन तसेच जलशक्ती विभाग आयुक्त ए. एस. गोयल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT