Railway officials and employees inspecting the scene after the explosion of detonators on the railway track between Sagaphata and Dongargaon. Railway officials and employees investigating the spot after the explosion of 'detonators'. esakal
जळगाव

Jalgaon News : बऱ्हाणपूरजवळ रेल्वे रुळावर स्फोट; ‘डिटोनेटर्स’चा वापर

सकाळ वृत्तसेवा

रावेर : भुसावळ रेल्वे विभागाच्या नेपानगर-बऱ्हाणपूर रेल्वेस्थानकांदरम्यान भारतीय सैन्य आणि युद्ध साहित्य घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीसमोर काही ‘डिटोनेटर्स’चा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामागे अतिरेकी आहे की अन्य कोणी, याबाबतचा तपास गुप्तचर यंत्रणांसह रेल्वे पोलिस करीत आहेत. या घटनेला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निल यांनी दुजोरा दिला आहे. ता. १८ सप्टेंबरला घडलेली ही घटना आज उघड झाली. (Use of blast detonator on railway track near Berhampore )

खंडवा येथून तिरुअनंतपुरम येथे जाणाऱ्या या रेल्वेगाडीत भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि युद्धात वापरली जाणारी विविध हत्यारे होती. अज्ञात व्यक्तींनी भुसावळ रेल्वे विभागाच्या बऱ्हाणपूर आणि नेपानगर या दोन मोठ्या स्थानकांमध्ये असलेल्या सागफाटा व डोंगरगावदरम्यान रेल्वे रुळावर हे ‘डिटोनेटर्स’ ठेवलेले आढळून आले. मात्र, ही अधिकाऱ्यांची रेल्वेगाडी येण्याच्या आधीच यातील काही ‘डिटोनेटर्स’चा स्फोट झाला. यामुळे रेल्वे यंत्रणा सतर्क झाली आणि ही रेल्वेगाडी नेपानगर रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली. (latest marathi news)

घटनास्थळी तातडीने श्वानपथक, रेल्वे पोलिस बल, अतिरेकी विरोधी दल यांच्यासह देशातील गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दल यांनी भेट दिली. या तपासकामी रेल्वेचे तेथील चाबीदार आणि ट्रॅकमन यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हे ‘डिटोनेटर्स’ रेल्वेने त्यांच्या कामासाठी उत्पादित केलेले असून, नेमके सैन्य दलाची रेल्वे येण्यापूर्वीच रेल्वे रुळावर ते का ठेवण्यात आले? यात अतिरेक्यांचा हात आहे की काय, याची चौकशी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाडी मुंब्रा बायपासवर आली, तेव्हाच अक्षयने बंदूक खेचली अन्... अखेर पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!

अक्षयला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला हवी होती; गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया

आरोपी Akshay Shinde याच्या मृत्यूमागे रश्मी शुल्कांचा हात, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वेळी नक्की काय घडलं? पोलिसांवर का व्यक्त केला जातोय संशय? वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT