mahayuti vs mahavikas aghadi  esakal
जळगाव

Jalgaon Vidhan Sabha: जिल्ह्यात महायुतीत 3-4 जागांवर ‘ओव्हरलॅपिंग’! इच्छुकांची तयारी; दिग्गजांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

Vidhan Sabha Election 2024 : गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली. शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पडून दोन स्वतंत्र पक्ष तयार झाले. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची संख्याही वाढली. स्वाभाविकत: सत्तेतील वाटेकरी आणि विरोधकांच्या गटातील पक्षीय बळही वाढलेय.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीला आता काही दिवस शिल्लक असताना, सर्वपक्षीय इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जळगाव जिल्ह्यात अकरापैकी किमान तीन ते चार विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांच्या दावेदारीचे ‘ओव्हरलॅपिंग’ होताना दिसतेय. त्यामुळे प्रचंड रस्सीखेच असलेल्या या जागांचा मोठा प्रश्‍न महायुतीसमोर आहे. (Jalgaon Vidhan Sabha election 2024 Overlapping on 4 seats in mahayuti in district)

गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली. शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पडून दोन स्वतंत्र पक्ष तयार झाले. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची संख्याही वाढली. स्वाभाविकत: सत्तेतील वाटेकरी आणि विरोधकांच्या गटातील पक्षीय बळही वाढलेय.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीत जसा सामना रंगला, तसाच आता विधानसभा निवडणुकीतही रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र, प्रत्येकच मतदारसंघात महायुती व आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने जागा वाटपावरून घमासान होणार आहे.

दावेदारीचे ‘ओव्हरलॅपिंग’

जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा आहेत. पैकी जळगाव शहरासह जामनेर, चाळीसगाव व भुसावळ, अशा चार ठिकाणी भाजपचे आमदार, जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल व चोपडा या चार ठिकाणी शिवसेनेचे, रावेरला कॉंग्रेसचे एकमेव, अमळनेरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत, तर मुक्ताईनगरात अपक्ष म्हणून निवडून आलेले व सध्या शिवसेनेशी संलग्न आमदार आहेत. या अकरापैकी किमान तीन ते चार जागांवर महायुतीच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच आहे.

किशोर पाटील, अमोल शिंदे

पाचोऱ्यात सामना अटळ

पाचोरा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर पाटील आमदार आहेत. या मतदारसंघात भाजपकडून अमोल शिंदे इच्छुक असून, गेल्या वेळी २०१९ ला त्यांनी युती असताना, अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व दुसऱ्या क्रमांकाची मतेही घेतली.

तेवढ्यावर ते शांत बसले नाहीत, तर मतदारसंघात त्यांची तयारी सुरूच आहे. विधानसभा लढण्याचे त्यांनी जाहीरही केले आहे. अमोल शिंदे यांच्या भूमिकेमुळे किशोर पाटील नाराज असून, त्यांच्यातील वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंतही गेल्याचे सांगितले जातेय. महायुतीच्या दृष्टीने ही जागा संवेदनशील आहे.

एरंडोलमध्येही रस्सीखेच

एरंडोल मतदारसंघात शिवसेनेचे चिमणराव पाटील आमदार असून, ते किंवा त्यांचे पुत्र अमोल पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापल्यानंतर ते शांत होते. आता लोकसभेसाठी ते इच्छुक होते. मात्र, पुन्हा त्यांनी शांत राहणे पसंत केले. विधानसभा निवडणुकीसाठी मात्र त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

चिमणराव पाटील & ए. टी. पाटील
अनिल पाटील & शिरीष चौधरी

अमळनेरमध्येही दावेदारी

अमळनेर मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीपर्यंत नेहमीच युती विरुद्ध आघाडी असा व विशेषत: भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सामना रंगला आहे. राष्ट्रवादीतून अजित पवारांचा गट वेगळा झाल्यानंतर येथील आमदार अनिल भाईदास पाटलांना थेट मंत्रिपद मिळाले, तर मूळ अमळनेर तालुक्यातीलच स्मिता वाघ खासदार झाल्यात. अनिल पाटलांनी स्मिता वाघांसाठी लोकसभा निवडणुकीत कामही केले. मात्र, गेल्या वेळी भाजपकडून निवडणूक लढविलेले माजी आमदार शिरीष चौधरी पुन्हा इच्छुक आहेत. त्यांच्या दावेदारीवरून या मतदारसंघातही वाद कायम आहे.

मुक्ताईनगरकडे लक्ष

मुक्ताईनगर मतदारसंघात चंद्रकांत पाटील शिवसेनेशी संलग्न अपक्ष आमदार आहेत. या मतदारसंघात नेहमीच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. मात्र, २०१९च्या निवडणुकीत रोहिणी खडसेंविरोधात कॉंग्रेस- राष्ट्रवादीसह सर्व पक्षांनी चंद्रकांत पाटलांना निवडून आणण्यात मदत केली.

खडसेंमुळे संधी मिळत नाही, अशी इथल्या भाजप नेत्यांची भावना होती. आता खडसेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलीय, तर त्यांच्या कन्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात आहेत. त्यामुळे भाजपचे अशोक कांडेलकर, नंदू महाजन दावेदारी करण्यासाठी सज्ज आहेत.

चंद्रकांत पाटील, अशोक कांडेलकर & नंदू महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT