Jalgaon Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव, नंदुरबारमध्ये आज मतदारांचा फैसला! लोकसभेच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

Lok Sabha Election : जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार या लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार या लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार राजकीय डाव-प्रतिडाव झाले. यामुळे तिन्ही मतदारसंघांत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. देशाचे राज कोणी चालवावे, यासाठी जनता मतदान करेल.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ११, जळगाव लोकसभा मतदारसंघात १४, तर रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. अगदी अपक्ष उमेदवारापासून सर्वांनाच विजयाची अपेक्षा असते, त्यामुळे त्यांच्यासह राजकीय पक्षाच्या उमेदवारांनीही जोर लावला आहे. मात्र, खऱ्या अर्थाने सामना राजकीय पक्षांतील उमेदवारांमध्ये होताना दिसतो.

जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पवार यांच्यात चुरस आहे. रावेर मतदारसंघात भाजप व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्रपक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात सामना होत आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या माजी आमदार असून, लोकसभेसाठी त्या प्रथमच मैदानात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार हेही प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी पारोळा पालिकेचे नगराध्यक्षपदही भूषविले आहे. स्मिता वाघ या राजकारणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आहेत. दोघांचा यशाचा दावा आहे. मात्र, जनता कोणावर शिक्कामोर्तब करणार, हे ४ जूनला समजेल. (latest marathi news)

रावेरमध्येही दोघांची परीक्षा

रावेरमध्ये भाजप व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात खऱ्या अर्थाने लढत होत आहे. रक्षा खडसे या दोन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपद व शिक्षण समितीचे सभापतिपदही भूषविले आहे.

श्री. पाटील प्रतिथयश उद्योगपती आहेत, मात्र राजकीय क्षेत्रात प्रथमच ते पर्दापण करीत आहेत. त्यामुळे जनता दरबारात खऱ्या अर्थाने त्यांचीही परीक्षा आहे. दोन्ही उमेदवारांनी यशासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. सोमवारी जनता कोणावर शिक्कामोर्तब करणार, हे ४ जूनला मतमोजणीच्या दिवशीच कळेल.

नंदुरबारमध्ये उत्सुकता

नंदुरबार मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील चार व धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातील १९ लाख ७० हजार ३२७ मतदार आपला हक्क बजावतील. नंदुरबार लोकसभेसाठी एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, मात्र खरी चुरस भाजप व महायुतीच्या डॉ. हीना गावित आणि काँग्रेस व महाविकास आघाडीचे ॲड. गोवाल पाडवी या दोघांमध्येच आहे.

या दोन्ही पक्षांच्या मुख्य उमेदवारांसह ११ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होईल. अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रांसाठी कर्मचाऱ्यांचा ताफा व यंत्रणा रवाना करण्यात आली आहे. नर्मदा नदीकाठावरील गावांसाठी बार्जचा वापर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT