Water from the ancient lake. esakal
जळगाव

Jalgaon Monsoon : सातपुडा परिसरात यंदा मूबलक पाऊस; लासूरच्या पुरातन तलावासह साखर बावलीला 12 वर्षांनंतर आले पाणी!

Jalgaon Monsoon : यावर्षी सातपुडा पर्वत व पायथ्यावरच्या गावांत सुमारे ७३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : यावर्षी सातपुडा पर्वत व पायथ्यावरच्या गावांत सुमारे ७३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बऱ्यापैकी पाऊस झाल्याने आता कूपनलिका व अन्य ठिकाणी कोरड्या पडलेल्या विहिरींनाही पाणी येत असल्याच्या चर्चा आहेत. अशातच लासूर येथील बाजार चौकातील पुरातन तलाव व साखर बावलीला पाणी आले असून, १२ वर्षांनंतर हा चमत्कार घडला आहे. कधी काळी या तलावाचे पाणी बाजार पट्ट्यात असलेल्या हॉटेलींमध्ये वापरले जात असे. (Water came after 12 years to Sakar Bavali along with ancient lake of Lasur )

तलाव पूर्ण भरलेला राहत असे आणि त्याच्यावरनं जाणारी वाऱ्याची झुळूक हळूवारपणे बाजार पट्ट्यात थंडगार गारवा देत असे. मात्र, काळ बदलला. या तलावाच्या भिंती कोसोळू लागल्या अन्‌ त्याला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले. मात्र, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने त्याला पाझर फुटू लागले. तलावात सुमारे पाच, सहा फूटांपर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे या ठिकाणचे चैतन्य वाढू लागल्याची चर्चा आता गावोगावी पसरू लागली आहे. (latest marathi news)

त्याचबरोबर लासूरपासून उत्तरेला असलेल्या साखर बावली या अहिल्याबाई होळकरांच्या काळापासून बांधण्यात आलेल्या पायविहीरीला पाणी आले असून, दररोज विहिरीची एक पायरी पाण्यात बुडत असल्याचे गावकऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. कधी काळी लासूरची रोनक असलेला बाजारातील तलाव व साखरबावली कोरडी पडल्याने त्यांचे महत्त्व कमी झाले होते. त्यातच तलाव बाजार चौकातच असल्याने कुठलीही घाण व टाकाऊ वस्तू त्यात टाकण्याची सर्रास प्रथा सुरू झाली होती. त्याचबरोबर भिंती व कठडे कोसळल्याने झाडेझुडपेही खूप वाढले आहेत.

मात्र, अशातच जर तलावाला पाणी आले तर गावकऱ्यांनी सार्वजनिक मोहीम राबवून झाडेझुडपे काढून त्याला स्वच्छ केल्यास पुन्हा या तलावाला गतवैभव प्राप्त होऊ शकते. साखर बावलीचा परिसर स्वच्छ व सुंदर केला असला तरी त्यात पाणी नसल्याने तेथील रोनक हरवली होती मात्र, आता पाणी आल्याने व याच साखर बवलीत पुरातन गणेश मंदिर असल्याने तेथील पावित्र्य वाढले आहे. या दोन्ही पुरातन वास्तूंना पाझर फुटून पाणी आल्याने परिसरात सर्व कुतूहलात्मक चर्चा वाऱ्यासारखी पसरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT