Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon Water Management : वाघूर धरणात 76 टक्के पाणीसाठा; शहराला 2 वर्षे पुरणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहराला दोन वर्षे पुरेल इतका पाणीसाठा वाघूर धरणात असल्याचे महापालिकेने शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘अल-निनो’ वादळाच्या पाश्‍र्वभमीवर शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाकडून पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा अहवाल मागविला आहे.

त्यानुसार वाघूर धरणात ७६ टक्के पाणीसाठा असून, दोन वर्षे टंचाई होणार नाही, याचा दिलासा जळगावकरांना मिळाला आहे. मात्र, टंचाईपूर्व नियोजनात शहरातील महापालिकेच्या कूपनलिका व हातपंप तातडीने दुरुस्त करण्यात येणार आहेत. (Jalgaon Water Management 76 percent water storage in Waghur Dam 2 years will be enough for city news)

‘अल निनो’च्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी व्यवस्थापन आराखडा व आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार जळगाव शहर महापालिकेने पाणीपुरवठ्याबाबत व पिण्याच्या पाण्याची टंचाईबाबत स्थायी आकस्मिक पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे, तसेच टंचाई निर्माण झाल्यास पाणीपुरवठा विभागाने उपाययोजनेचा कृतिआरखडा तयार केला आहे. तो शासनाला पाठविण्यात आला असल्याची माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा होता. वाघूर धरणात सद्यस्थितीत एकूण साठा २६८.७६६ दशलक्ष घनमीटर, जिवंत साठा १९०.०७७ दशलक्ष घनमीटर आहे, तर धरणाची पाणी पातळी २३२.२७ इतकी आहे. जलसाठा ७६.४८ टक्के इतका आहे.

दोन वर्षे टंचाई नाही

जळगाव शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाख आहे. वाघूर धरणात पाणी आरक्षण ४० दशलक्ष घनमीटर इतके आहे. शहरास दररोज ९० एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा दोन वर्षे पुरेल एवढा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

..तर टंचाईवर उपाययोजना

महापालिकेतर्फे पाणीटंचाई निर्माण झाल्यास आराखडाही कळविण्यात आला असल्याचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले. पाणीटंचाई निर्माण झाल्यास शहरात पाणीपुरवठा दोन दिवसांऐवजी तीन दिवसांआड करण्यात येईल.

शहरातील कूपनलिका, हातपंप ३१० आहेत. ते तातडीने दुरुस्ती करून कार्यन्वित करण्यात येतील. महापालिकेने विंधन विहीर करून त्यावर वीजपंप बसविले आहेत. त्याचा उपयोग १५० ठिकाणी टँकर भरता येतील.

शहरातील मेहरुण तलाव, अंबरझरा तलाव या ठिकाणचा गाळ काढणे, तसेच वाघूर धरणातील मृत जलसाठातील आकस्मित योजनेची तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT