Jalgaon water scarcity closed pipeline wasted Thousands liters water  sakal
जळगाव

जळगाव : बंद जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी

तोंडापूरसह १७ गावांची पाणीपुरवठा योजना बंद; तरीही पाणी येते कुठून, पाणीचोरीचा संशय, चौकशीची मागणी

सतीश बिऱ्हाडे

तोंडापूर : येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या सतरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मात्र हे पाणी कोणाचे, काय गौडबंगाल आहे? त्याचा शोधून घेऊन वाया जाणाऱ्या पाणी बंद करावे, अशी मागणी होत आहे.

तोंडापूर येथील मध्यम प्रकल्पातून सतरा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना कित्येक दिवसांपासून बंद आहे. त्यावरील वीजपुरवठाही बंद असून, जामनेर मार्गावर रस्त्याला लागून चक्क बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून दोन, तीन दिवसाआड हजारो लिटर वाया जात असून, हे पाणी कोणाचे, असा प्रश्न गावकऱ्यांपुढे उभा आहे. या योजनेतून पाणीपुरवठा सुरू असताना धरणातून शेतात जाणाऱ्या ४० जलवाहिन्यांपैकी एखाद्या जलवाहिनीतून पाणी चोरी होते काय किंवा इतर शंका निर्माण होत आहे.

अचानक बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या व्हाल्वमधून हजारो लिटर पाणी कसे वाया जात आहे. सद्यस्थितीत तोंडापूर धरणाची पाणीपातळी ४२ टक्के असून, दिवसेदिवस ती कमी होत जाणार आहे. त्यामुळे तोंडापूर गावाला पाणीटंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून लाखों रुपये खर्च करून १७ गावांसाठी मोठा प्रकल्प बांधण्यात आला आहे. त्याचा वापरही करण्यात आला. आता मात्र या बांधलेल्या पाणीपुरवठा योजनेतील साहित्य चोरीला जात आहे. त्याकडेही हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. तिचा वापर होत नसल्यामुळे साहित्य खराब होत आहे.

गौडबंगाल काय?

वीजपुरवठा बंद असूनही गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या योजनेच्या जलवाहिनीमधून पाणी वाया जात असून, हे वाया जाणारे पाणी नक्की कोणाचे आहे, याची पाणीपुरवठा विभागाने चौकशी करून ऐन पाणीटंचाईच्या काळात वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा, ज्या गावात पाण्याची टंचाई आहे त्यांना पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT