Chief Executive Officer of Zilla Parishad Ankit with Deputy Chief Executive Officer Aniket Patil while taking information about the water problem. esakal
जळगाव

Jalgaon Water Shortage : एरंडोलमध्ये 6 दिवसाआड पाणीपुरवठा; तालुक्यात 8 गावांमध्ये पाण्याची समस्या

Jalgaon News : अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा असताना देखील शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

आल्हाद जोशी

एरंडोल : अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा असताना देखील शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तालुक्यात आठ गावात पाण्याची समस्या निर्माण झाली असून, प्रशासनातर्फे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. (Jalgaon Water Shortage 6 days water supply in Erandol Water problem in eight villages)

पिंपळकोठा बुद्रुक येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी भेट देऊन पाण्याच्या समस्येबाबत माहिती जाणून घेतली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा असूनही शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे. शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठा दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचा असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठ्याबाबत पालिकेचे नियोजन पूर्णपणे चुकले असल्याची संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गाकडून व्यक्त केली जात आहेत.

शहरात सर्वच भागात अनेक खासगी व सार्वजनिक नळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. तालुक्यात तळई, आडगाव आणि विखरण या मोठ्या गावांसह पिंपळकोठा बुद्रुक, अंतुर्ली, पिंप्री प्रा.चा., पिंप्री बुद्रुक, चोरटक्की या आठ गावांत पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी पिंपळकोठा बुद्रुक येथे भेट देऊन पाण्याच्या टंचाईबाबत माहिती जाणून घेतली. टंचाईग्रस्त गावात तातडीने उपाययोजना करून पाण्याची समस्या दूर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले. (latest marathi news)

या वेळी ग्रामविस्तार अधिकारी एन. डी. ढाके, चिमणराव पाटील, भरत पाटील, पाणीपुरवठा शाखा अभियंता शिंदे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी श्री. अंकित यांनी पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांबाबत माहिती जाणून घेतली.

तालुक्यात मे महिन्यात ग्रामीण भागातील अनेक गावांत पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात नादुरुस्त असलेल्या हातपंपांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे टंचाईग्रस्त गावात प्रचारासाठी जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वस्त्यांकडे...

दरम्यान, ग्रामीण भागासह जंगलात पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे जनावरांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पाण्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर माकडे शहरात येत आहे. तालुक्यात अनेक सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या निर्माण झालेल्या गावात मोफत पाण्याचे टँकर सुरू करून ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तहसीलदार सुचिता चव्हाण, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील पाण्याची समस्या सोडविण्याबाबत उपाययोजना करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT