Jalgaon Weather Update Sakal
जळगाव

Jalgaon Weather Update : खानदेशात मॉन्सूनचे आगमन 12 जूनच्या पुढेच होणार; आजपासून 3 दिवस वळवाचा पाऊस शक्य

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Weather Update : मान्सूनच्या केरळातील सुखद आगमनानंतर आता तो पुढील वाटचाल करीत आहे. यादरम्यान खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत शनिवार (ता. १) ते सोमवार (ता. ३)पर्यंत वारा-वादळासह गडगडाटी वळिवाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंदमानमध्ये या वर्षी जवळपास वेळेवर दाखल झालेला मॉन्सून केरळात नेहमीपेक्षा व यंदाच्या अंदाजित दिवसाच्या एक दिवस अगोदरच ३० मेस दाखल झाला. (Monsoon arrival in Khandesh will be before June 12 )

‘रेमल’ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामामुळे वातावरणीय घडामोडीतून मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मेस पोहोचला असला, तरी महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत १० जूनदरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे.

नाशिक, खानदेशात १२ जूनच्या पुढे

नाशिक व खान्देशात मॉन्सून १२ ते १५ जूनदरम्यान पोहोचू शकतो. त्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाच्या वळिवाच्या सरीही कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (latest marathi news)

पेरणीसाठी अद्याप अवकाश

सध्याची एकंदरित वातावरणीय स्थिती पाहता, पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण २० जूनपर्यंतही कदाचित वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. पेरणी होणार आहे, पण सध्याच्या या वातावरणीय पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी अतिआत्मविश्वासावर, उगाचच धूळपेरणी वा बाठर ओलीवर पेरणीचे धाडस करू नये, असे हवामान खात्याने कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT