Jalgaon News : लग्न झाल्यानंतर थोड्या थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फोटात होते. घटस्फोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असते. हे टाळण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यामुळे असे समुपदेशन कक्ष प्रत्येक जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा नियोजन भवनाच्या बैठक कक्षात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. (Chakankar statement Efforts for counseling rooms in every district)
या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत, विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
बालविवाह बंदसाठी प्रयत्न करा
त्या म्हणाल्या, की आजही बालविवाहासारख्या प्रथा दुर्देवाने सुरू आहेत. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती आहे. पण बालविवाह का करू नये, याची माहिती अधिक व्यापक प्रमाणात होणे गरजेचे आहे. महिला विधवा झाली की तिच्यावर अनेक सामाजिक बंधणे लादली जातात.
ती बंद व्हावीत, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करून तिच्या मुलांना वाढविण्यासाठी तिला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी समाज शिक्षणाची मोठी गरज आहे. प्रत्येक गावामध्ये या दोन्ही गोष्टीसाठी ग्रामसभेत ठराव होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा. (latest marathi news)
स्त्री भ्रूण हत्या रोखा
त्या म्हणाल्या, की स्त्री आणि पुरुष यांच्या जन्माचे प्रमाण असमान असण्यामागे स्त्री लिंगाची गर्भातच हत्या करण्याचे अत्यंत दुर्देवी प्रकार होत आहेत. यासाठी पीसीएनडीटी हा कडक कायदा असून, चोरून असे प्रकार होतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी लोकचळवळ होणे गरजेचे आहे. स्त्री भ्रण हत्या करणाऱ्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यात कडक कारवाईची गरज आहे.
मुख्यमंत्री योजनादूत नेमले जात आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी शासनाच्या विविध योजना, कायदे यांची माहिती दिली जाणार आहे. त्यात आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विविध योजना, कायदे केले आहेत. ते या योजनादूतांना योग्य ते प्रशिक्षण देऊन ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.