An instrumentalist on a song by Swami Band esakal
जळगाव

Jalgaon News : 'बँड' ने बदलला 'लुक'! कालौघात नावातून 'ब्रास' शब्दही 'बाद'

Jalgaon : एके काळी लग्नात बँड मोठी हौसेची गोष्ट होती, बँड मधील वाद्यही वेगळी होती.

ॲड. बाळकृष्ण पाटील

Jalgaon News : एके काळी लग्नात बँड मोठी हौसेची गोष्ट होती, बँड मधील वाद्यही वेगळी होती. आता पाच, सहा दशकांचा काळ ओलांडला असताना बँड ने आपला 'लूक' बदलला असून कधीकाळी बँडच्या नावात असलेला 'ब्रास 'शब्दही आता बाद झाल्यात जमा झाला आहे. साधारणपणे १९८०-८५ पर्यत बँड मध्ये वाद्य विशेषतः पितळेची होती. आताची एक दोन सोडली तर वाद्यही दुसरीच होती. आणि ना लोटगाडी होती ना गाडी होती. (word brass which was once part of band name has also been phased out)

हळूहळू स्पीकर धरणारे दोन जण कमी झाले आणि त्यांच्या जागी लोटगाडी आली. पुढे ती स्टीलची झाली. पुन्हा बदल झाला. त्याजागी लहान चारचाकी गाडी आली,मग पुढे मेटॅडोर आली मग ४०७ आली. मग ट्रक आली. आणि आता तर सजवलेली मोठी गाडीच आली. तिच्यावर नक्षीकाम आणि स्टील बॉडीची सजावट आली. हायड्रॉलिक सिस्टीम आली. कधी डीजेची पूर्ण सिस्टीम तर कधी मोठे स्पीकर ठेवत सर्व बदलच काळाच्या ओघात बदलत गेले.

तसे पाहिले तर बँड आता विवाह लावताना पहिल्या दिवशी हळद,रात्रीचे नाचणे आणि दुसऱ्या दिवसाचे लग्न असा करार होतो. पूर्वी रात्रीचे नाचणे नव्हते.१९८० ते १९८५ च्या काळात तालुक्यात नावाजलेल्या बॅंड ला लग्नासाठी ५०० रुपये मोजावे लागत. बीद किंवा फुनके असल्यास ९०० ते १००० रुपये द्यावे लागत असत. (latest marathi news)

बँड मध्ये त्याकाळीही १२ ते १५ वादक असत.साधारणपणे त्याकाळात घोडगाव येथील इक्बाल बँड, भगवान बँड, यावलचा लुकमान बँड, धरणगाव आणि अमळनेर मध्ये ताज बँड, धुळ्यात जयशंकर,विजय बँड जोरात होते. त्याकाळी शहनाई पार्ट्याही होत्या. त्यातून अमळनेर मध्ये एक दोन आणि घोडगावला सुभाष गुरव आजही त्या क्षेत्रात आहेत.

ऐंशी नव्वदच्या दशकात ब्रास बँड खूप होते. त्यात ब्रास मधील क्लारनेट, अफोनियम, सेक्सोफोन, ईफ्लाट,ट्रम्पेट, शहनाई, बासरी हे साहित्य होते. ऱ्हिदम मध्ये थापढोल, रनढोल, टिमकी, ड्रम(पडघम) तबला, ढोलक राहत असे . आक्टोपॅड, हार्मोनिअम, ऑर्गन यांचे एकत्रीकरण आता कीबोर्ड मध्ये झाले आहे. पूर्वी बऱ्याच क्लासिकल गाण्यांचे बँड मधील कलाकार सराव करत.

पूर्वीचे बरेच वाद्य आता बँड मध्ये नाहीत. सेक्सोफोन वाजविणे तसे जुन्या जाणकार कलाकाराचेच काम. तेव्हापासून आताही घोडगाव येथील नबी मास्टर ते वाजवितात. दिलीप मास्टर सेक्सोफोन वाजवतात. ८०-९०च्या दशकात इक्बाल बँड चे मालक खानदेशातच नव्हे तर सूरत मधेही बऱ्याच लग्नात बँड वाजवत. आता बँड साठीची रक्कम लोकप्रियतेनुसार ४० हजारांपासून लाखापर्यंत झाली असून ऑर्केस्ट्रा मधील साहित्य आणि लायटिंगही बँड मध्ये आली. बँड ने आता लुक बदलला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT