This attractive and grand interloop is built on National Highway No. 53 near Varangaon-Phulgaon in Bhusawal Taluka. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : चौपदरी, सहापदरी राष्ट्रीय महामार्गावर वाहने ‘सुसाट’; ‘नेटवर्क’ विस्तारले

Lok Sabha Constituency : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर चिखली-तरसोदसह पुढे चिखली ते खामगावपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने पूर्ण झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Constituency : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर चिखली-तरसोदसह पुढे चिखली ते खामगावपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने पूर्ण झाले. खानदेशातील हजारो गजाननभक्त आता अवघ्या दोन तासांत शेगावी पोचतात. हाच नव्हे, तर रावेर मतदारसंघातून चारही दिशांना जाणाऱ्या मार्गांची कामे पूर्णत्वात आली आणि या मार्गांवरून वाहने ‘सुसाट’ झालीत. ( work of roads leading from Raver constituency in four directions were completed )

रस्ते देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघाचे लोकसभेत सलग दोनदा प्रतिनिधित्व करणाऱ्या रक्षा खडसेंनी गेल्या दहा वर्षांत विशेषत: रस्ते विकासाच्या कामांवर ‘फोकस’ केला. त्यातून हजारो कोटींचे रस्ते प्रकल्प उभे राहिले. त्यामुळे कनेक्टिव्हीटी वाढून विकासाची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित महामार्गाचे चौपदरीकरण मार्गी

गुजरात, खानदेश आणि थेट विदर्भाला जोडणाऱ्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. केंद्रात मोदींचे सरकार आले. नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री झाले आणि संपूर्ण देशात रस्त्यांच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना तो महामार्ग क्रमांक ५३ करण्यात आला व थेट नवापूर ते अमरावती या जवळपास चारशे किलोमीटरच्या टप्प्यातील कामाची प्रक्रिया सुरू झाली.

चार टप्प्यांतील या कामात फागणे-तरसोद व पुढे तरसोद-चिखलीचे काम जळगाव जिल्ह्याशी संबंधित. पैकी तरसोद-चिखली या टप्प्यातील कामाला रक्षा खडसेंनी गती देण्यासाठी पाठपुरावा करताना चांगल्या व गुणवत्तापूर्ण कामासाठी आग्रह धरला. त्यासाठी गडकरींकडून चांगली कंत्राटदार एजन्सी मागून घेतली. ( latest political news )

वेल्स्पन नावाच्या नामांकित कंपनीला चिखली-तरसोद टप्प्यातील ६३ किलोमीटर चौपदरीकरणाचे काम सोपविण्यात आले. १ हजार ८३ कोटींच्या खर्चाचे हे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत ते पूर्ण झाले. २२ एप्रिल २०२२ ला त्याचे गडकरींच्या हस्ते थाटात लोकार्पण झालेय.

विकासाची प्रक्रिया गतिमान

रस्त्यांचा विकास झाला, की अन्य घटकांचा विकास होणे स्वाभाविक होऊन बसते. तरसोद-भुसावळदरम्यान हा महामार्ग सहापदरी आहे. पुढे चिखलीपर्यंत चौपदरी असून, चिखली ते खामगाव हा ६० किलोमीटरचा मार्गही चौपदरी झाला आहे. चौपदरीकरणामुळे या रस्त्याच्या दुतर्फा मोठे हॉटेल्स, अन्य प्रोजेक्ट उभारण्यात आलेय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराचीही निर्मिती झाली.

शेगावला पोहोचा दोन तासांत

जळगाव, धुळे, नंदुरबारसह या भागातून हजारो भक्त गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावी जात असतात. विदर्भातील या पंढरीला जाण्यासाठी भक्तांची महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चांगली सोय झाली. एरवी जुन्या महमार्गावरून जाण्यासाठी भक्तांना जळगावहून चार तास लागत होते. आता अवघ्या दोन तासांत शेगावी पोहोचून महाराजांचे दर्शन घेता येते. फागणे-तरसोद या ८७ किलोमीटर टप्प्याचे चौपदरीकरणाचे कामही आता पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबारचा विदर्भाशी कनेक्ट सोपा झाला आहे.

अन्य महामार्गही प्रगतिपथावर

विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील व विशेषत: रावेर मतदारसंघातून जाणाऱ्या प्रमुख व वर्दळीच्या मार्गांनाही महामार्गात रूपांतरित करून त्यांचे विस्तारीकरण मार्गी लागले आहे. यात जळगाव-छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या १५० किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण, त्यात जळगाव-पहूर हद्दीपर्यंतचा ४० किलोमीटरचा मार्ग ७८५ कोटींच्या खर्चाचा आहे. पहूर-इच्छापूर (बऱ्हाणपूर) या ८०९ किलोमीटरच्या मार्गासाठी ७७४ कोटींचा निधी मंजूर होऊन हे कामही जवळपास पूर्ण झाले आहे.

भविष्यातील रस्ते विकास

नशिराबाद-मलकापूर, पाचोरा-वरखेडी-शेंदुर्णी-पहूर या दोन्ही मार्गांच्या राष्ट्रीय महामार्गातील समावेशाबाबत रक्षा खडसेंचा पाठपुरावा सुरू आहे. फागणे- अमळनेर-चोपडा-खरगोन या मार्गाचेही राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार असून, भविष्यातील ही कामे जळगाव जिल्ह्याच्या व एकूणच रावेर मतदारसंघाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरणार आहेत.

मध्यप्रदेश- महाराष्ट्रासह गुजरातशी थेट ‘कनेक्ट’

मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा ‘दुवा’ म्हणून बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गाचा उल्लेख होतो. या जवळपास २३२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित व प्रलंबित आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या केळीच्या बागा व शेती आहे. या संपूर्ण रस्त्यावर अनेक गावे, शहरेही वसली आहेत.

त्यामुळे या तिन्ही राज्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार, वाहतूक सुरू असते. भौगोलिक रचनेमुळे या रस्त्याच्या विकासात बऱ्याच अडचणी येत आहेत. तरीही गेल्या काळात या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वेक्षण झाले. विस्तृत प्रकल्प अहवालही (डीपीआर) तयार करण्यात आला आहे.

मध्यंतरी हा प्रस्तावित चौपदरी मार्ग रावेरजवळून न जाता रावेरला वळसा घालून मुक्ताईनगर तालुक्यातून वळविण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यास रक्षा खडसेंनी कडाडून विरोध केला. महामार्ग विभाग, मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर तो आहे त्याच स्थितीतून, आहे त्याच मार्गावरून जाण्यासंबंधी खडसेंनी आश्‍वासन मिळविले आहे. येणाऱ्या काही दिवसांत त्याचे काम मंजूर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT