जळगाव : भोलाणे गावात लग्नाच्या कार्यक्रमात एका तरुणाला चौघांनी मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर अपमान सहन न झालेल्या तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (ता.१८) सकाळी आठला उघडकीस आला. भूषण लक्ष्मण कोळी (वय २० रा. भोलाणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Jalgaon young man took extreme step marathi news)
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, भोलाणे येथे भूषण कोळी आई वडील लहान भावासोबत रहायला आहे. शनिवार (ता.१७) गावात लग्न असल्याने भूषणचा मध्यरात्री दोनला त्याच गावातील तरूणांसोबत वाद झाला.
त्यामुळे त्याला गावातील स्वप्नील गोकूळ कोळी, गोविंदा जगन कोळी, कृष्णा ऊर्फ अरुण कोळी आणि किरण गणेश कोळी या चौघांनी मारहाण केली. काही चुकले नसतांना सर्वांसमक्ष झालेल्या मारहाणीच्या अपमानातून भूषण याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. अशी त्याच्या कुटुंबीयांची तक्रार आहे.
मृत भूषणचे काका जनार्दन श्यामराव कोळी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले दिवस उजाडल्यावरही भूषण बाहेर कसा येत नाही. म्हणून कुटुंबीयांनी पाहिले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. जळगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तपासात कारण होईल स्पष्ट
भूषण कोळी याच्या मृत्यू प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद तालुका पोलिसांत करण्यात आली असून त्याला झालेल्या मारहाणीची चौकशी करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विरुद्ध कारवाईची कुटुंबीयांची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.