Fund  esakal
जळगाव

Jalgaon ZP News : अंगणवाड्यांचा 6 कोटी 89 लाखांचा निधी परत; जिल्हा परिषदेचा असाही गोंधळ

Jalgaon ZP : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जिल्ह्यात तीन हजार ६४१ अंगणवाड्यांपैकी जवळपास ४५० अंगणवाड्यांना छत नाही.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon ZP News : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जिल्ह्यात तीन हजार ६४१ अंगणवाड्यांपैकी जवळपास ४५० अंगणवाड्यांना छत नाही. गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर करण्यात आलेल्या २७६ अंगणवाड्यांपैकी ९७ अंगणवाड्यांची कामे अपूर्ण आहेत. (Jalgaon ZP 6 Crore 89 Lakh Fund of Anganwadis Returned)

तर ६ कोटी ८९ लाखांचा निधी महिला बालकल्याण विभागाच्या हलगर्जीपणामुळे अखर्चित राहिल्याने शासनाकडे परत गेला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांसाठी तीन वर्षांत ३०० खोल्या मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी १८४ अंगणवाड्यांच्या खोल्या पूर्ण झाल्या असून.

११६ खोल्यांचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे कामांना गती मिळत नसल्याने मंजूर निधीपैकी कमीच निधी मिळत आहे. ताेही खर्च होत नाही. याला प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल. जिल्ह्यात आजही ३५ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरत आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारतींची प्रतिक्षा आजही कायम आहे. (latest marathi news)

जिल्ह्यात जवळपास ४५० अंगणवाड्यांना इमारती नाहीत. बहुतांश ठिकाणी शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या ठिकाणी अंगणवाड्या भरतात. पालकमंत्री व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत विभागाशी समन्वय होत नसल्याने अनेक समस्या उद्‌भवत आहेत. जिल्हाभरात एकूण नव्याने ३०० अंगणवाड्यांच्या बांधकामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ११६ अंगणवाड्यांचे बांधकाम प्रगतीत असल्याचे सांगण्यात आले.

यंदा १० कोटी मंजूर

अंगणवाड्यांसाठी यंदा १० कोटी १२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील कामांच्या खर्चासाठी हा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी मार्च २०२५ ची मुदत देण्यात आली आहे. अपूर्ण असलेल्या कामांना महिला बालकल्याण विभागाच्या कासवगतीच्या कारभाराने हा निधी खर्च करण्यावर साशंका निर्माण होत आहे. गेल्या दोन वर्षांचीच कामे अपूर्ण असल्याने यंदा कामांना मंजुरी मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT