jalgaon zp ceo ankit statement about File tracking system jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon ZP CEO News : ‘फाईल ट्रॅकिंग सिस्‍टीम’ नागरिकांसाठीही खुली करणार! : जि. प. सीईओ अंकित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon ZP CEO News : जिल्‍हा परिषदेतील कामकाज पारदर्शक करण्याचा प्रयत्‍न आहे. त्यानुषंगाने जिल्‍हा परिषदेत यापूर्वीच ‘फाईल ट्रॅकिंग सिस्‍टीम’ सुरू करण्यात आलेली असून, ही अजूनही चांगल्‍या प्रकारे कार्यरत आहे. तरी देखील टेबलावर फाईल पेंडींग राहत असल्‍याची माहिती घेत असतो.

परंतु, काम लवकर मार्गी लावायचे असेल व यात अधिक पारदर्शकता आणायची असेल, तर यासाठी येत्‍या काही महिन्‍यात फाईल ट्रॅकिंग सिस्‍टीम नागरिकांसाठीदेखील खुली करण्याचा मानस जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्‍ये बोलताना व्‍यक्‍त केला. (jalgaon zp ceo ankit statement about File tracking system jalgaon news)

‘सकाळ’च्या शहर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमाअंतर्गत सीईओ अंकित यांनी जिल्हा परिषेद सीईओ म्हणून काम करतांनाचे पुढील व्हिजन, तसेच त्यांचा आतापर्यंतचा प्रवास याबाबत दिलखुलास संवाद साधला. यात प्रामुख्याने सर्व्हे वाढवून कुपोषण किती आहे; याची माहिती घेत पोषण सप्ताह राबवून ते प्रमाण कमी करायचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

असे वळले सेवा क्षेत्राकडे

मूळचे हरियाणा येथील असलेले श्री अंकित यांचे संपूर्ण शिक्षण दिल्ली येथे झाले. २०१६ मध्ये बी. टेक. मेकॅनिकल झाल्यानंतर जपान येथे होंडा रिसर्च डेव्हलपमेंट येथे कामाला लागले. दोन महिने कंपनीत गाडीचे सर्व पार्ट जोडण्याचे काम केले. यानंतर रिसर्चचे काम केले. मात्र, हे करताना जपानमध्ये प्रमोशन लवकर मिळत नसल्याची जाणीव झाली.

यामुळे यूपीएससीच्या तयारीला सुरवात केली. २०१७ मध्ये परीक्षा दिली. परंतु पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. काय कमी राहिले हे समजून घेत तयारी सुरु केली. २०१८ मध्ये दिलेल्या परीक्षेत चांगली रँक मिळाली. यानंतर २०१९ मध्ये सेवेत रुजू होत पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण घेतले.

गडचिरोलीत पहिली पोस्टिंग

सोलापूर जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग सुरू असतानाच, कोरोना काळात नोडल ऑफिसर म्हणून काम सांभाळून फिल्डवर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर अक्कलकोट येथे मुख्याधिकारी व बीडीओ असे दोन्ही चार्ज सांभाळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर तहसीलदार हा चार्ज सांभाळताना ग्राम पंचायत निवडणुकीचे काम सांभाळले. हा अनुभव घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे एसडीएम म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली.

बचतगटांना प्रशिक्षण

जळगाव जिल्ह्यात केळी, कापसाचे मोठे उत्पादन आहे. यामुळे बचत गटाच्या माध्यमातून केळी व कापसावर काही प्रक्रिया उद्योग करण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय जळगावची सुवर्ण बाजारपेठदेखील प्रसिद्ध आहे.

या सुवर्ण बाजारात सोन्याचे डिझाईन करण्यासाठी बंगाली कारागीर मोठ्या प्रमाणात आले आहेत. परंतु, सुरतला असलेल्या डायमंड डिझाईन हबप्रमाणे सोन्याच्या वेगवेगळ्या डिझाईन बचतगटाच्या महिलांना ट्रेनिंग देऊन करता येतील; तसा प्रयत्न असेल.

‘पेसा’ क्षेत्रातील शिक्षक भरती लवकरच

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या भरपूर जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागांवरील भरतीची प्रक्रिया शासनामार्फत राबविली जाईल. परंतु पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या साधारण ३० जागा रिक्त आहेत.

ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेअंतर्गत राबविता येते. ही भरती प्रक्रिया येत्या काही महिन्यात राबविली जाईल. तसेच, उर्वरित अनुकंपा भरतीचे काम २ महिन्यात राबविणार असल्याचे श्री. अंकित यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींमुळे कामांची अंमलबजावणी सुलभ

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींनी चालविलेला कारभार असतो. सध्या जिल्हा परिषदेत दीड वर्षांपासून प्रशासक आहे, त्यामुळे काही अडचण येते किंवा काम सुलभ होते का? याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मुळात बॉडी किंवा लोकप्रतिनिधी हा जिल्हा परिषदेचा एक भाग आहे.

लोकप्रतिनिधी हे असायलाच हवे. त्यांच्यामार्फत गावातील माहिती प्रशासनापर्यंत पोहचत असते. लोकप्रतिनिधी नियोजन करुन देतात. त्यांना कामांचा प्राधान्यक्रम माहीत असतो. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम मग सुलभ होते.

सात दिवसांत फाईल लागेल मार्गी

जिल्हा परिषदेत फाईल लवकर निकाली लागावी यासाठी फाईल ट्रेकिंग सिस्टीम आहे. तरी देखील काही टेबलांवर फाईल पेंडिंग राहत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी सोडवून देण्यासाठी ट्रेकिंग सिस्टीम नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. मुळात एखाद्या कामाची फाईल तयार झाल्यानंतर ती सात दिवसात निकाली लागेल याच्यावर भर राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT