Jalgaon News : जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या कमळगाव (ता. चोपडा) येथील तीन आदिवासी बालकांच्या मृत्यूने शासकीय तथा प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, मंगळवारी (ता. २३) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), जिल्हा आरोग्य अधिकारी. (ZP CEO reviewed case of children death)
जिल्हा जलजीवन मिशन प्रकल्प अधिकारी आदींनी अडावद प्राथमिक आरोग्य केद्राला भेट देऊन 'त्या' बालकांच्या अकस्मात मृत्यू प्रकारणाचा आढावा घेतला. तसेच नागरिकांच्या आरोग्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. कमळगाव शेत शिवारात १८ जुलैला सीताराम बारेला यांच्या दोन बालकांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाला.
तसेच दुसऱ्या दिवशी तिसरा बालकही दगावला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २३) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा जलजिवन मिशन प्रकल्प संचालक भरत कोसोदे. (latest marathi news)
विस्तार अधिकारी जितेंद्र पाटील, सुशील सोनवणे यांनी प्राथमिक आरोग्य केद्रात येऊन पावसाळ्याच्या दिवसात साथीच्या आजाराचा फैलाव होणार नाही, यासाठी आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिल्या.
या वेळी सीएचओ डॉ. दिनेश चौधरी, सरपंच बबनखा तडवी, ग्रामविकास अधिकारी पी. डी. सैदाणे, विजय देशमुख, वाय. आर. पाटील व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर मुख्य कार्यकरी अधिकारी यांनी कमळगाव ग्रामपंचायतीस भेट दिली व आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.