Nationalist Congress Party (Sharad Pawar group) state president Jayant Patil driving a tractor during the farmers' protest rally on Thursday esakal
जळगाव

Jayant Patil: जिल्ह्यातील तीनही मंत्री अपयशी ठरल्याने मुख्यमंत्र्यांनी द्यावे शेतकऱ्यांकडे लक्ष : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jayant Patil : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पीक विमा मिळाला नाही. भाव नसल्याने कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरात आहे. अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील तीनही मंत्री मदत करण्यास अपयशी ठरले आहेत. (Jayant Patil statement of all three ministers in district have failed Chief Minister should pay attention to farmers jalgaon news)

त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (ता. ३०) येथे केली. पक्षातर्फे झालेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या समारोपावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. श्री. पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. एमआयडीसीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतून मोर्चाला सुरुवात झाली. ‘शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे' अशा घोषणा मोर्चात देण्यात आल्या.

अण्णाभाऊ साठे चौकातून ट्रॅक्टरसह सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. माजीमंत्री आमदार एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, ज्येष्ठ नेते अरूणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप सोनवणे, विकास पवार आदी मोर्चाच्या अग्रभागी होते. जिल्हाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष, डॉ. पाटील, श्री. देवकर, श्री. खडसे आदींनी निवेदन दिले.

सरकारवर ओढले आसूड

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर सभा घेण्यात आली. त्यात जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकारवर आसूड ओढले. जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली. राज्यातील सरकार घोषणाबाज आहे. सरकारने कापसाला बारा हजार रुपये दर द्यावा. सध्या सात हजार रुपये देण्यात येत आहे. तसेच सरकारने क्विटंलला पाच हजार रुपये सबसिडी शेतकऱ्यांना देऊन कापूस खरेदी करावा, असे त्यांनी सांगितले.

तीनही मंत्र्यांना गावबंदी करा : डॉ. पाटील

डॉ. सतीश पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील तीनही मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवू शकले नाहीत. त्यांना आता गावबंदी केली पाहिजे. गिरीश महाजन यांनी कापसाला सात हजार रुपये भाव द्यावा, यासाठी उपोषण केले होते. मात्र आता मंत्री झाल्यावर ते कापसाच्या भावावर बोलण्यास तयार नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष देण्यास वेळ नाही. मंत्री अनिल पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. परंतु ते सुध्दा शेतकऱ्यांना मदत करू शकले नाहीत.

दुष्काळ जाहीर करा : देवकर

श्री. देवकर म्हणाले, की अवकाळी पावसामुळे जिल्‍ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात शंभर टक्के दुष्काळ जाहीर करावा. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्यात यावी. कापसाला भाव देण्यात यावा.

श्री. गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार बी. एस. पाटील, राजीव देशमुख, ग्रंथालय प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सहकार आघाडीचे वाल्मीक पाटील, सोपान पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पाटील, वंदना पाटील, मंगला पाटील, एजाज मलीक, रिता बाविस्कर आदी उपस्थित होते.

इतिहासाची पुनर्रावृत्ती झाली : खडसे

श्री. खडसे म्हणाले, की दहा वर्षापूर्वी जळगाव कापूस प्रश्‍नावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ट्रॅक्टरचे सारथ्य गोपीनाथराव मुंडे यांनी केले होते. त्यानंतर त्यावेळचे सरकार पडले व भाजपचे सरकार आले होते. आजही इतिहासाची पुनर्रावृत्ती झाली. मोर्चात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले आहे.

त्यामुळे राज्यातील हे सरकार पडणार आणि आपले महाविकास आघाडीचे सरकार येणार. आत्ताचे राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याकडे दुर्लक्ष करत आहे. जनता या सरकारला घालवणार आहे. केळी उत्पादकांना अद्याप पीक विमा मिळाला नाही. अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही ते शेतकऱ्यांना मदत करू शकले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू- सुप्रिया सुळे

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT