Police while removing encroachments on compartment no.24 and 25  esakal
जळगाव

Jalgaon News : अतिक्रमण काढणाऱ्यांवर दगडफेक; ‘जेसीबी’चालक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सातपुडा पर्वतरांगांच्या जंगलातील गारबर्डी (ता. रावेर) गावाजवळ स्थानिकांनी वन विभागाच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महसूल, पोलिस व वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना आज (ता. ४) दुपारी एकच्या सुमारास घडली. (JCB driver seriously injured by stone pelting on encroachers jalgaon news)

यामुळे पाच ‘जेसीबीं’चे मोठे नुकसान झाले असून एका ‘जेसीबी’ चालकाला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी, की गारबर्डी गावाजवळील मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक २४ आणि २५ मध्ये दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असलेले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसले होते. त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना हटकले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती.

त्यामुळे आज वन विभागाच्या विनंतीनुसार महसूल व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यात रावेरचे तहसीलदार बी. ए. कापसे, परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, फैजपूरचे विभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, रावेरचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, मंडळाधिकारी सचिन पाटील, वन विभागाचे अजय बावने, श्री. हडपे तसेच रावेर, सावदा, निंभोरा येथील पोलिस व वन विभागाचे कर्मचारी मिळून १५० जणांचा सहभाग होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अतिक्रमण काढण्यासाठी मोठा फौजफाटा आल्याचे पाहून अतिक्रमण करणारे संतप्त झाले. अशातच ‘जेसीबी’चा धक्का लागल्याचे निमित्त करून अतिक्रमण करणाऱ्या चाळीस ते पन्नास जणांनी अतिक्रमण काढण्यासाठी विरोध केला व अचानक ‘जेसीबीं’सह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड दगडफेक केली. ज्यात एक कर्मचारी डोक्याला दगड लागल्याने गंभीर जखमी झाला.

अतिक्रमणधारकांचा संताप काहीसा ओसरल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा वन हक्क दावा मंजूर नसून त्यांनी अतिक्रमण केलेले आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी तेथील चार ते पाच झोपड्या तोडून अतिक्रमण नष्ट केले. तसेच त्यांनी नांगरलेली सुमारे १५ एकर जमीन पुन्हा ताब्यात घेतली.

शासकीय कारवाईत अडथळा केल्याबद्दलचा गुन्हा वन विभागामार्फत नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही मोठी कारवाई असल्यामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि वनविभागाचे उपवनसंरक्षक या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT