जळगाव : कासमवाडी ते लक्ष्मीनगर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. मक्तेदाराकडून मुरूमाऐवजी चक्क काळी माती टाकण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी निवेदनात केला आहे. (Kasamwadi to Lakshmi Nagar road work is of very poor quality jalgaon news)
प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेने लक्ष्मीनगर ते कासमवाडी जुना मेहरूण रस्त्यांच्या कामाची नुकतीच निविदा काढली होती. त्या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. तिथे मुरूमऐवजी काळी माती टाकली जात आहे.
त्या ठिकाणी स्क्रॅपिंग न करता रस्त्याचे काम सुरू केले आहे. तिथे खडीच्या ठिकाणी मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सुपर व्हिजन करण्यात येत नाही. याला सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
या रस्त्यांची लवकरात लवकर पाहणी करून काळी माती हटवून व दगड हटवून तिथे स्क्रॅपिंग करून व चांगला मुरूम टाकण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. वेळीच लक्ष देऊन कामाचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक नागरिकांना घेऊन रस्त्यांचे कामबंद आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, इब्राहिम तडवी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, अमोल कोल्हे, रफिक पटेल, चेतन पवार आदींनी हे निवेदन दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.