Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University esakal
जळगाव

Jalgaon NMU News : बहिणाबाई चौधरी, साने गुरुजींच्या नावाने शिष्यवृत्ती; संशोधनास मिळणार प्रोत्साहन

सकाळ वृत्तसेवा

NMU Scholarship News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा अंतर्गत पूज्य साने गुरुजी संशोधन फेलोशिप, कवयित्री बहिणाबाई संशोधन फेलोशिप सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज संशोधन फेलोशिप यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. (kbcnmu decided to start Sane Guruji and Poet Bahinabai Research Fellowship jalgaon news)

१८ जुलैस झालेल्या विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत रिसर्च फेलोशिपसाठी तयार केलेल्या नियमावलीला मान्यता देण्यात आली. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियमावली तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती.

पीएच.डी. आवश्‍यक

या तिन्ही फेलोशिपसाठी विद्यार्थी पीएच.डी.साठी नोंदणी झालेला आवश्यक आहे. संशोधनाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज, पूज्य साने गुरुजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यांशी संबंधित असावा. या तीन फेलोशिपसाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण सहा विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये फेलोशिप दिली जाणार आहे. या फेलोशिपच्या नियमावलीला विद्या परिषदेने मान्यता दिली.

बी.एड. परीक्षेची वेळ वाढवून दिली

बी.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अडीच तासांऐवजी तीन तास वेळ वाढवून देण्यास विद्या परिषदेने मान्यता दिली. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात वर्णनात्मक लेखन जास्त करावे लागत असल्यामुळे तीन तासांचा वेळ परीक्षेसाठी द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत अभ्यास मंडळाने विद्या परिषदेकडे शिफारस केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेले कॉमन क्रेडिटच्या वितरण सौरचनेला मान्यता देण्यात आली. शैक्षणिक धोरणाबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या सुधारित शिफारसींनाही सहमती देण्यात आली. श्रेणी/गुणवत्ता सुधार योजना नियमावलीत सुधारणा करण्यासाठी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

या समितीच्या शिफारसींना विद्या परिषदेने मान्यता दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी. प्रदान करण्यासंदर्भात नवीन नियमावली लागू केली असून, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. शेवटी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.

गुणवत्तेशी तडजोड नाही : कुलगुरू

गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. अभ्यासक्रम चांगले निर्माण केले व नियमित तासिका झाल्या, तर विद्यार्थ्यांचा वर्गात येण्याचा ओढा वाढेल.

प्रत्येक महाविद्यालयात ४१५ (१) नुसार पदे भरण्याबाबत आग्रह विद्यापीठाकडून धरला जाईल, त्यासाठी काही महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. मात्र, पद भरणे आवश्यक आहे, असे कुलगुरू म्हणाले.

समिती नियुक्त

या पदभरतीसंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेंद्र रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्राचार्य अरविंद चौधरी, डॉ. दीपिका चौधरी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. राजपूत, डॉ. एस. टी. खैरनार, डॉ. साहेबराव भुकन, डॉ. अनिल डोंगरे यांचा समावेश करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT