Kiran Marathe who won gold medal in weightlifting category and Rinki Pawara student (first from right) won bronze medal in running esakal
जळगाव

Khelo India : ‘खेलो इंडिया’त उमविकडून सुवर्ण, कांस्यपदकाची कमाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास एक सुवर्ण तर एक कांस्य पदक प्राप्त झाले आहे. (kbcnmu won 1 gold and 1 bronze medal in Khelo India competition jalgaon news)

नोएडा येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील भारोत्तोलन ७३ किलोग्रॅम वजन गटात विद्यापीठ खेळाडू किरण मराठे (व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर) याने सुवर्णपदक पटकावले आहे.

यापूर्वी चंदीगढ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ भारोत्तोलन स्पर्धेत या खेळाडूने रौप्‍य पदक प्राप्त केले होते. या स्पर्धेतून प्रथम आठ खेळाडू निवडले गेले त्‍यामध्ये किरण मराठेचा समावेश होता. अत्यंत चुरशीची स्पर्धेत मराठेने सुवर्णपदक पटकावले आहे. प्रशिक्षक म्हणून प्रा.उमेश पाटील यांनी काम पाहिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रिंकीला कांस्यपदक

लखनऊ येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्‍पर्धेतील ५०००मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रिंकी पावरा (जीटीपी महाविद्यालय नंदुरबार) हिने १६ मिनिटे ५९ सेकंदात स्पर्धा पूर्ण करून कास्य पदक प्राप्त केले. यापूर्वी चेन्नई येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेत तीने रौप्य पदक प्राप्त केले होते.

प्रशिक्षक म्हणून डॉ. शैलेश पाटील (धनदाई महाविद्यालय, अमळनेर) यांनी काम पाहिले. किरण मराठे व रिंकी पावरा यांच्या यशाबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी अभिनंदन केले अशी माहिती क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT