Eknath Khadse esakal
जळगाव

Jalgaon News: मंत्री महाजनांसह दोघा आमदारांकडून खडसे Target; DPDCत रंगला सामना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘मेडिसीनची बिले डीपीडीसीतून देतो आहे, तर देऊ द्या ना, तुमच्या घरचे काय जाते. उगाच खोडा घालू नका’, या शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी या निधीबाबत आक्षेप घेणाऱ्या एकनाथ खडसे यांना सुनावले. तर महामार्ग चौपदरीकरण, तालुका क्रीडासंकुल व अन्य मुद्द्यांवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील या सर्वांनीच खडसे यांना ‘टार्गेट’ केले. अनुभवी खडसे यांनी मात्र अभ्यासू व मुद्देसूद उत्तरे देत सर्वांना निरुत्तर केले.

चिखली ते फागणेदरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या एल ॲन्ड टी कंपनीला जिल्ह्यातून कोणी पळविले, त्याची चौकशी करा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. मुक्ताईनगरला क्रीडासंकुल भाडेतत्त्वावर शिक्षण संस्थेला काही वर्षांपूर्वी का दिले, याचीही चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. आमदार खडसे यांनी विकासाबाबत, निधी देण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर मंत्री महाजन, आमदार पाटील, आमदार चव्हाण यांनी सभेत टार्गेट करून त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. (Khadse Target from two MLAs including Minister Mahajan in DPDC Jalgaon News)

सत्तांतरानंतरची पहिली सभा

राज्यातील सत्तातरानंतर भाजप-शिंदे शिवसेना गटाची सत्ता आली आहे. त्यानंतर ही पहिलीच डीपीडीसी झाली. ती सभा आमदार खडसे गाजविणार, त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे कशी खोडून काढायची याची रंगीत तालीम अगोदर भाजप-शिंदे शिवसेना गटाच्या काही आमदारांनी केल्याचे सभेत दिसून आले.

जळगावातील रस्त्यांच्या विषयावरून वाद सुरू

खडाजंगी, वादाला सुरवात झाली, ती जळगाव शहरातील रस्त्यांना डीपीडीसीतून निधी देण्याच्या प्रश्‍नावरून. निधी देऊनही शहरात रस्ते नसल्याचे ओरड आमदार राजूमामा भोळे यांनी केली. तोच मुद्दा पकडत आमदार खडसे यांनी सभागृहाला माहिती दिली, की डीपीडीसीतून निधी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी असतो. तो निधी शहरातील रस्त्यांसाठी दिला. मात्र, रस्ते झालेले नाहीत. झाले त्याचा दर्जा निकृष्ट आहे. शहरात निधी दिला, तर ग्रामीण भागातील विकास कसा होणार, असा प्रश्‍न आमदार खडसे यांनी केला. डीपीडीसीतून मेडिसीनची बिले देण्याचा विषय समोर आला असता, त्याला आमदार खडसे यांनी केव्हाची बिले आहेत, कोरोनाकाळातील बिले असल्याचे नियोजन अधिकारी पाटील यांनी सांगितले. ती बिले शासन देईल ना, डीपीडीसीचा निधी ग्रामीण भागासाठी वापरा, अशी सूचना खडसे यांनी केली.

महाजनांचे प्रत्युत्तर

त्यावर मंत्री महाजन म्हणाले, की तुमच्या घरचे काय जाते, शासनाकडून निधी आला आहे, तो देऊ द्या ना. तुमच्या काळातही (महाविकास आघाडी) असा निधी गेला आहे. खोडा घालू नका. त्यावर हा निधी कोरोनाकाळातच मंजूर झाला आहे. तो आता देत असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

चौपदरीकरण का रखडले?

तरसोद ते फागणे महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ते काम का पूर्ण होत नाही, असा प्रश्‍न आमदार खडसे यांनी विचारला असता, त्यावर आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की जिल्ह्यात ‘एल ॲन्ड टी’ कंपनीने चौपदरीकरणाचा कंत्राट घेतला होता. मात्र, तो लोकप्रतिनिधींच्या त्रासामुळे पळून गेला, याची चौकशी करा. त्यावर खडसे म्हणाले, की सखोल चौकशी करा. या वेळी पालकमंत्री महाजन यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.

क्रीडासंकुलावरून प्रतिस्पर्धी भिडले

मुक्ताईनगर तालुक्यात शासकीय क्रीडासंकुल तयार करावे, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. जे आहे ते खासगी शाळेच्या जागेवर आहे. त्यावर खडसे यांनी सांगितले, की तत्कालीन शासनाने क्रीडासंकुल शिक्षण संस्थेकडून काही वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. त्यामुळे नवीन क्रीडासंकुलाची गरज नाही. त्यावर आमदार पाटील यांनी शासकीय क्रीडासंकुल करायला पाहिजे, भाड्याने घेतलेले रद्द करता येते, असा मुद्दा मांडला. त्यावर खडसे म्हणाले, की हे आम्हाला माहीत नव्हते, तेव्हा आम्ही लहान होतो, आता तुमच्याकडून माहीत झाले.

सादरेंच्या आत्महत्येचा विषयही उकरून काढला

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी नाशिक येथे आत्महत्या केली होती, तो जुना विषयही सभेत उकरून काढण्यात आला. अवैध वाळूच्या विषयावर चर्चा सुरू असताना, आमदार मंगेश चव्हाण यांनी अशोक सादरे यांनी वाळूमाफियांकडून आलेल्या धमक्यामुळे आत्महत्या केली होती. तो वाळूमाफिया कोणाचा समर्थक होता, याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT