जळगाव : शहरातील कापड दुकानदाराच्या मुलाने घेतलेल्या ७ लाख रुपयांच्या वसुलीसाठी अपहरण करुन त्याला जैनाबादमध्ये डांबून ठेवल्याची घटना गुरुवारी (ता. २३) रात्री घडली. (Kidnapping of youth for recovery of 7 lakhs jalgaon crime news)
धारदार चॉपरसह बेस बॉल दांड्याच्या जोरावर धमकावुन पैशांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सागर सैंदाणे व शेखर सपकाळे या दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अपहरण व डांबुन ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॉलनीमध्ये सनी इंद्रकुमार साहित्या हा तरुण वास्तव्यास असून, तो वडीलांसोबत दुकान चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. सनी साहित्याला गरज असल्याने त्याने जैनाबाद येथील सागर सैंदाणे याच्याकडून ६ मार्चला ७ लाख रुपये (बँकेच्या आरटीजीएसच्या माध्यमातून)घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये त्याने १८ मार्चला रोख स्वरुपात परतही केले.
फोनकरुन घरून बोलावले
गुरुवारी (ता. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास सनी घरी असताना त्याला सागर सैंदाणे याने फोन करुन, पू. ना. गाडगीळ (रिंगरोड) येथे भेटायला ये असे सांगितले. त्यानुसार सनी हा तातडीने पियुष मंधाण या मित्राला सोबत घेवून भेटण्यासाठी गेला. त्याचवेळी सैंदाणे याच्याकडे असलेल्या क्रेटा कार (एमएच ०९, एफबी ७७२७)मध्ये सनीचा हात ओढून गाडीत बसविले.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
आपण जेवणासाठी बाहेर जात असल्याने सांगत सनीसोबत असलेले आकाश दुबे, आदर्श पुरोहीत, पियूष मंधाण अशा तिघा मित्रांनासुद्धा त्यांनी गाडीत बसविले. कार चालक शेखर सपकाळे याने सुसाट वेगाने कार जैनाबादच्या दिशेने पळविली.
त्यावर सनी याने आम्हाला कुठे नेत आहे? असे विचारले असता, तुझ्याकडे असलेले माझे उसणे पैसे तू परत कधी करणार आहेस, ते माझ्या आईसोबत दोन मिनिटे बोलण्यासाठी तुला घेवून जात असल्याचे सांगत त्याला सैंदाणेच्या घरी नेण्यात आले.
धारदार शस्त्रांद्वारे धमकी
सैंदाणेच्या घरात चौथ्या मजल्यावर नेवून दोघांनी त्यांच्याजवळील धारदार चॉपर व बेस बॉलच्या दांड्याची धमकी देत सनीला वडील इंद्रकुमार साहित्या यांना फोन लावण्यास सांगितले. तसेच, आताच्या आत्ता पैसे घेवून या, असे सागांयला लावून धमकाविल्याचे व बळजबरीने अटकावून ठेवले असून तुम्ही ऐकटे येवू नका, त्यांच्याकडे धारदार हत्यारे आहेत, असेही सनी सांगू लागल्याने त्याच्या वडीलांनीही त्या ठिकाणी धाव घेतली.
अपहरण, डांबून ठेवल्याचा गुन्हा
जैनाबाद येथील सागर सैंदाणे याच्या तावडीतून सुटका झाल्यावर दुसऱ्या दिवशी सनी साहित्याचे वडील त्याला घेवून जिल्हापेठ पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले. सनीने दिलेल्या जबाबावरुन सागर सैंदाणे व शेख सपकाळे या दोघांविरुद्ध अपहरण करुन डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.
अवैध सावकारीवर उपचार सापडेना!
शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारीचे धंदे सुरु आहेत. शहरातील ठरावीक भागातील सावकारांकडून मोठ्या व्यापाऱ्यांची मुलं, अडचणीत असलेले व्यवसायीक अशांना उसनवारीच्या नावाखाली चक्क स्टॅम्प करुन, ऑनलाईन पद्धतीने व्याजाचा धंदा चालवत आहेत.
नंतर चक्रवाढ दराने जबरी वसुलीसाठी गैरप्रकारांचा वापर करुन संबधीतांचा छळ केला जातो. पोलिसांशी मैत्री असलेल्या या गुंडांकडून सर्रास चक्रवाढ व्याजाने सावकारी सुरु असल्याचे जिल् हापेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.