Jalgaon News : कोळी समाजाला सरसकट जातीचे प्रमाणपत्र दिलेच पाहिजे. शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशारा शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी दिला आहे.
जळगाव येथे कोळी समाजाचे सरसकट जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.( Koli community demand for cast certificat jalgaon news )
त्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शरद कोळी जळगाव येथे आले होते.हॉटेल के.पी.प्राइड येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे उपस्थित होते.
श्री. कोळी म्हणाले, की समाजाचे अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मात्र मंत्र्यांना भेट देण्यास वेळ नाही, कोळी समाजाबाबत शासनाने त्वरित निर्णय घेतला पाहिजे. जर त्वरित निर्णय घेतला नाही तर कोणत्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही.
आम्ही यांना सत्तेवर बसवू शकतो तर खाली देखील उतरवू शकतो. कोळी समाजाला न्याय मिळाला नाही तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीची महापूजा मंत्र्यांच्या हस्ते होवू दिली जाणार नाही असा इशारा यावेळी श्री. कोळी यांनी दिला.
पालकमंत्र्यांना जनता धडा शिकवेल
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना शरद कोळी म्हणाले, गुलाबराव पाटील यांना शरद कोळी यांची धास्ती आहे, त्यामुळेच त्यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता २०२४ च्या निवडणुकीत निश्चित त्यांना त्याची जागा दाखवून देईन.
आपण शिवसेनेचे उपनेते आहोत. त्यामुळे आपण गुलाबराव पाटील यांच्यासारख्या लहान माणसाविरूद्ध लढणार नाही. आमचे गुलाबराव वाघ त्यांना पराभूत करतील.
राणे यांच्यावर टीका
नारायण राणे म्हणतात आम्ही ९६ कुळी मराठा आहोत, त्यामुळे आम्हाला कुणबी आरक्षण नको आहे, मात्र त्यांचा मुलगा कुणबी मराठा समाजासाठी आंदोलन करीत आहे. श्री. राणे यांनी जरांगे यांचे मराठा आरक्षणाचे आंदोलन संपविण्याची सुपारी घेतली असल्याचा संशय येत आहे. मात्र त्यांनी कितीही विरोध केला तरी मनोज जरांगे यांचे आंदोलन योग्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.