lalit patil md drug case esakal
जळगाव

Lalit Patil Drug Case: ललित पाटीलचे चाळीसगाव कनेक्शन शोधा; आमदार मंगेश चव्हाण यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Lalit Patil Drug Case: ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे जळगाव- चाळीसगाव कनेक्शन तसेच भुसावळ येथील दाबण्यात आलेले ड्रग्ज प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देऊन याचा सखोल तपास करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

आमदार चव्हाण यांनी गृहमंत्री फडणवीस यांना दिलेल्‍या पत्राचा आशय असा ः गेल्या काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याचा नाशिक येथील एमडी ड्रग्जचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. (Lalit Patil Drug Case Demand of MLA Mangesh Chavan to find Chalisgaon connection jalgaon news)

त्या अनुषंगाने राज्यभरात ड्रग्ज प्रकरणाची पायेमुळे शोधून काढत अनेकांना अटक देखील केली. राज्य सरकारची ही ड्रग्जविरोधी कारवाई कौतुकास्पद आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने गेल्या महिन्याभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काही वक्तव्य केले असून ललित पानपाटीलचे जळगाव व चाळीसगाव कनेक्शन असल्याचे आरोप केले होते.

जळगाव जिल्ह्यातील व चाळीसगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला विनंती करतो, की या आरोपांच्या अनुषंगाने निःष्पक्षपणे चौकशी करावी. जळगाव, चाळीसगाव किंवा जे काही कनेक्शन ललित पाटील (पानपाटील) ड्रग्ज प्रकरणाशी असेल ते शोधावे.

लैंगिक छळ प्रकरणही तपासावे

महिन्याभरापूर्वी भुसावळ येथे घडलेल्या एका तरुणीच्या लैंगिक छळाची गंभीर घटना जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी तोडीपानी करून दडपून टाकण्यात आल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

या अमानवीय घटनेतील युवकांनी एमडी ड्रग्जच्या नशेत आपण हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या जवळ खाजगीत मान्य केले होते. याबाबत पोलिसांनी एमडी ड्रग्ज कोणाजवळून घेतले, याबाबत विचारले असता त्यांनी भुसावळ शहरातील तीन ते चार व्यक्तींची नावे घेतली होती.

या सर्व व्यक्ती विरोधी पक्षाच्या एक आमदाराच्या जवळच्या असून त्यांच्या आशीर्वादाने ते या भागात एमडी ड्रग्जचा अवैध व्यवसाय करतात. हे ड्रग्ज विकणाऱ्यांचे कनेक्शन हे थेट ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्याशी असल्याची देखील चर्चा आहे. तरी ललित पाटील याचे जळगाव, चाळीसगाव कनेक्शन तसेच भुसावळ येथील दाबण्यात आलेले ड्रग्ज प्रकरण या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने आपण सखोल व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत.

याबाबत संशयितांची नावे तसेच संपूर्ण घटनाक्रम यांची माहिती मी स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे देणार आहे. भुसावळ येथील प्रकरण गंभीर असून गेल्या महिनाभरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’, संबंधित पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी व संशयितांचे कॉल डिटेल्स तपासण्यात येऊन त्या अनुषंगाने देखील सखोल तपास करावा, अशी विनंती आमदार मंगेश चव्हाण यांनी या पत्रात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT