Ganesh Visarjan news file photo esakal
जळगाव

Jalgaon Ganesh Visarjan: पहाटे पावणेसहाला शेवटच्या गणपतीचे विसर्जन; जिल्हाधिकारी, आयुक्त थिरकले ढोलाच्या तालावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Ganesh Visarjan : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्दशीला श्रीगणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’, अशी विनंतीही करण्यात आली. सर्वच ठिकाणी गणेशविसर्जन मिरवणुका शांततेत झाल्या.

सकाळी दहापासून मिरवणुका सुरू झाल्या होता. मध्यरात्री बारानंतर वाद्य वाजविण्यास बंदी करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. २९) पहाटे पावणेसहाला शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. (Last Ganesh Visarjan at early morning Collector Commissioner danced on beat of drum jalgaon)

मिरवणुकीत जळगाव महापालिकेचा पहिला मानाचा गणपती होता. गणपतीला निरोप देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मिरवणुकीत हाती ढोल घेत जल्लोष केला. आयुक्त विद्या गायकवाड यादेखील मिरवणुकीत ढोलताशांच्या गजरात थिरकल्या. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शहरातील विविध गणेश मंडळांनी ढोल पथक, झांज पथक लावली होती. आपला गणेश मंडळाचे पथक चांगले प्रात्यक्षिके कसे करेल, देखावा कसा आकर्षित दिसेल यावर सर्वंच मंडळांनी भर दिला होता. गुलालासह फुलांच्या पाकळ्यांची उधळण मिरवणुकीत झाल्याने रस्ते गुलालाने माखले होते.

मेहरूण तलावावर सकाळपासूनच गर्दी

मेहरूण तलावावर सकाळपासूनच घरगुती गणपती विसर्जनासाठी भाविकांनी कुटुंबीयांसह गर्दी केली होती. वाजतगाजत मूर्ती आणून तिची आरती करून भावपूर्ण निरोप देताना भाविक दिसत होते.

मोदक, खोबऱ्याचा प्रसाद वाटपही होत होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मेहरूण तलावावर नावेत बसून एक फेरफटका मारला. भाविकांनी गर्दी न करता शांततेत विसर्जनाचे आवाहन त्यांनी केले.

कडक बंदोबस्त

मेहरूण तलावावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहता पोलिस, महिला पोलिस, होमगार्ड अधिक संख्येने येथे बंदोबस्तावर होते. भाविकांना एकाच ठिकाणी अधिक काळ थांबू न देणे, थांबल्यास तेथून जाण्यास सांगणे, कुटुंबासमोरच कर्त्या पुरुषाचा अपमान करणे असे प्रकार पोलिस करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

रात्री नऊपर्यंत घरगुती गणपती विसर्जनासाठी आले. नंतर मोठे गणपती विसर्जनासाठी आल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात गणपती असे विसर्जित झाले

सार्वजनिक - १,३६३

खासगी - ५०४

एक गाव-एक गणपती - १११

एकूण - १,९७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT