Ashok Jain trustee of Gandhitirtha with Prabhudayal's historic bicycle esakal
जळगाव

Jalgaon News : गांधीजींची ‘ती’ सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना महात्मा गांधींनी दिलेली ऐतिहासिक सायकल गांधीतीर्थच्या म्युझियममध्ये दाखल झालीय.(late prabhudayal vidyarthi cycle given by Gandhiji installed in museum of gandhitirth jalgaon marathi news)

गांधीतीर्थ व पर्यायाने जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून, हा ठेवा पर्यटकांसाठी मोलाचा ठरेल, असा विश्‍वास विश्‍वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यसेनानी प्रभुदयालजी यांच्या पत्नी तथा माजी आमदार श्रीमती कमला साहनी आणि त्यांची मुलगी अमिया रुंगठा यांनी ही सायकल महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या सांगण्यावरून सायकल गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी सुभाष साळुंखे यांच्याकडे दिली.

आज सकाळी ती सायकल जळगाव येथे आणली गेली. महात्मा गांधीजींच्या परिस स्पर्शाने आठवणींचे सोने झालेली ही सायकल गांधीतीर्थमध्ये लवकरच संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.

असा आहे इतिहास

जोगिया उदयपूर निवासी स्वातंत्र्यसेनानी स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांची स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका होती. १९३५ मध्ये ते केवळ १० वर्षांचे असताना महात्मा गांधीजींचे शिष्य ठक्करबाप्पा यांच्यासोबत ते गांधीजींना सेवाग्राम येथे प्रथम भेटले. कस्तुरबा यांना प्रभुदयाल यांचा परिचय देताना ‘हा तुझा सहावा मुलगा असल्याचे गांधी म्हणाले होते.

पुढील १४ वर्षे त्यांनी सेवाग्राम आश्रमात राहून गांधींच्या मार्गदर्शनात काम केले. स्वातंत्र्यानंतर प्रभुदयालजी यांना आपल्या गावी जाऊन जनसेवा करण्यासाठी गांधीजींनी प्रोत्साहित केले व या कार्यात त्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी त्यांनी सायकल भेट दिली. त्यांच्या याच कार्यामुळे ते ‘पूर्वांचलचे गांधी’ म्हणून ओळखले जायचे. याच सायकलवर फिरून पाच वेळा तेथे आमदारही झाले.

"महात्मा गांधीजींच्या स्मृतीचा सुगंध असलेल्या या सायकलीचे गांधीतीर्थ येथील अस्तित्व सुयोग्य असेच ठरणार आहे." -अशोक जैन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT