Jalgaon News : शिरसोली शेतशिवारात बांधलेल्या म्हशीच्या पाडसाचा बिबट्याने फडशा पाडला. याबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी कळविल्यावर वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. (leopard kills buffalo in shirsoli jalgaon news)
शिरसोली प्र. न. (ता. जळगाव) येथील पांडुरंग प्रताप बोबडे यांच्या नायगाव शिवारातील शेतात असलेल्या खळवाडीत बांधलेल्या जनावरांवर शनिवारी (ता. ८) मध्यरात्रीनंतर बिबट्याने हल्ला चढवला. गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या पाडसावर हल्ला करून ते फस्त केले. रविवारी (ता. ९) सकाळी पांडुरंग बोबडे शेतात गेल्यानंतर त्यांना गोठ्यात पारडू दिसले नाही.
त्यांनी शोध घेतला असता, त्यांना मृत्युमुखी पडलेले पाडस आढळून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसपाटलांसह ग्रामस्थांना दिली. त्यावरून ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. वन विभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या पावलांच्या ठश्यांची पाहणी करून तो बिबट्याच असल्याची खात्री केली. नंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. वन विभागाने या घटनेची नोंद घेतली आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
बिबट्याची दहशत कायम
उन्हाळा सुरू झाला असून, वनक्षेत्रात अन्न, पाण्याविना वन्यजीवांचे स्थलांतर सुरू आहे. गेल्या आठवड्यातच शिवाजीनगर परिसरात हरणाचे जोडपे कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. एका हरणाचा कुत्र्यांनी फाडशा पाडला. पंधरा दिवसांपूर्वी शिरसोली शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.
शिरसोली-दापोरा शिवारात गिरणा नदीचा परिसर, म्हसावदच्या टेकड्या आणि शिरसोली ते उमाळा, चिंचोली विमानतळाचा भाग, मण्यारखेडा तलाव, जैन हिल्स परिसरापर्यंत अन्न-पाण्याच्या शोधात बिबट्यांचा मुक्तसंचार वाढला आहे. शिरसोली शिवारात वारंवार बिबट्याचा उपद्रव जाणवत असून, मानवी वस्त्यांवर हल्ला चढविण्यापूर्वीच वन विभागाने बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.