crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे एकाच वेळी 3 ठिकाणी छापे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी एकाच वेळी तीन ठिकाणी छापेमारी करीत वसंत टॉकीज समोरील गायत्री पान सेंटर व टेक्निकल हायस्कूल (दुकान) तसेच सोमानी गार्डन येथील घरातून अंदाजे तीन लाखांचा केसरयुक्त विमल पान मसाला महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्यात प्रतिबंधित असलेले मानवी जीवनास अपायकारक असलेला तंबाखू जन्य सुगंधित पान मसाला जप्त केला असून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. (Local crime branch team conducted raids at 3 places jalgaon crime news)

अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भुसावळ शहरात विमल गुटख्याचा मोठा साठा विक्रीसाठी आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे दोन पथके तयार करून भुसावळला रवाना केले.

शुक्रवारी (ता.७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान वसंत टॉकीज समोरील गायत्री पान सेंटर व टेक्निकल हायस्कूल (दुकान) तसेच सोमानी गार्डन येथील घरातून अंदाजे तीन लाखांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सदरील कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी अप्पासाहेब पवार व सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील, गणेश वाघमारे, युनूस शेख, सुनील दामोदर, दीपक पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, श्रीकृष्ण देशमुख, किशोर राठोड, रणजित जाधव, प्रमोद ठाकूर, हितेश महाजन, अमोल कर्डेकर, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे व कर्मचारी आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

Kolhapur North Results : सतेज पाटलांचा बालेकिल्ला ढासळला; राजेश लाटकरांना अपेक्षित मताधिक्य नाहीच!

SCROLL FOR NEXT