Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime: भुसावळ शहरातील बंद घरे चोरट्यांचे सावज! भरवस्तीत 2 ठिकाणी चोरी

पोलिस गस्त ढेपाळल्याने घटना घडल्याचे बोलले जात असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांत बंद घरांना चोरटे लक्ष्य करीत असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे.

शहरात रविवारी (ता. ७) रात्री शहरातील खडका रोड भागातील पटेल कॉलनी तसेच वांजोळा रोडवरील श्रीहरी नगर येथे चोरट्यांनी बंद घरांचा कडी-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने, रोकडसह एकूण साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस गस्त ढेपाळल्याने घटना घडल्याचे बोलले जात असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. (Locked houses in Bhusawal city prey to thieves Stealing at 2 trusted locations Jalgaon Crime)

शहरातील खडका रोड परिसरातील पटेल कॉलनीतील रहिवासी इम्तियाज युनूस बागवान हे रविवारी (ता. ७) लग्नाला गेले होते.

दरम्यान, रात्री नऊनंतर चोरट्याने त्यांच्याघरात प्रवेश करून तीन लाख रोख व दोन लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

तसेच घराचे चारही दरवाजे उघडे ठेवून चोरटे पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत वांजोळा रस्त्यावरील श्रीहरी नगर भागातील रहिवासी मुकेशकुमार राधाकिशन कुमावत यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडो तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

सोफा कम बेडमध्ये ठेवलेले नऊ लाख ९० हजार रुपये रविवारी (ता. ७) दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान चोरून नेले.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश जाधव तपास करीत आहेत.

पोलिसांना आव्हान

सध्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हे अधिवेशन व नियोजन समिती बैठकीत तरुणीवर झालेला अत्याचार व ‘ड्रॅग’ प्रकरणावरून गाजत आहे.

या बाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे तक्रार पाठविल्याने गृहमंत्री यांनी चौकशी आदेश दिले आहेत.

त्यातच चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने आता पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासोबत पोलिस यंत्रणेपुढे घटनांना आळा घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी चोरी, घरफोडीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष घालून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी

शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही भागांमध्ये रात्रीची पोलिस गस्त होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. शहर आणि बाजारपेठ अशी दोन्ही महत्त्वाची पोलिस ठाणी असतानाही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

आताही रात्रीची गस्त केवळ नावालाच आहे. त्यामुळे शहरातील भरवस्तीत दोन ठिकाणी घरफोडीचे धाडस झाले.

विशेष म्हणजे, तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने किरकोळ चोऱ्यांची माहिती देण्यास अनेकजण टाळाटाळ करतात. मात्र, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT