Gram Panchayat Election Esakal
जळगाव

Gram Panchayat Election: जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीचा झेंडा; भाजपला सर्वाधिक 58 जागा

Flag of Mahayuti in Gram Panchayat Elections in Jalgaon District; BJP has maximum 58 seats

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayat Election : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटप्रणीत महायुतीने सर्वाधिक जागा मिळवत झेंडा फडकविला आहे. यात भाजपला ५८ जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी आपला प्रभाव कायम राखला आहे. आमदारांनी आपले गड शाबूत ठेवले आहेत.

जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. (Mahayuti win in Gram Panchayat Elections in Jalgaon District news)

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक १२३ जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यात भाजपने सर्वाधिक ५८ जागा मिळाल्याचा, तर शिवसेना शिंदे गटाला ४८ जागा मिळाल्याचा दावा केला आहे. त्याखालोखाल शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाला जागा मिळाल्या आहेत. काही ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे.

आमदारांनी आपले गड राखले

जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसनमंत्री अनिल पाटील या मंत्र्यांसह बहुतेक आमदारांनी आपले गड कायम राखले आहेत. माजी आमदारांनीही काही ठिकाणी आपले वर्चस्व राखले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील १७ पैकी १७ जागांवर विजय मिळविला.

गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यातील ३२ पैकी २७ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या अमळनेर मतदारसंघातील १४ पैकी सात ग्रामपंचायतींवर यश मिळविले आहे.

महाविकास आघाडीला अपयश

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उबाठा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. तीनही पक्षमिळून केवळ ३३ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.

पक्षीय बलाबल असे

भाजप- ५८, शिवसेना शिंदे गट- ४८, शरद पवार गट- १८, ठाकरे गट- ११, अजित पवार गट- १७, काँग्रेस- चार व इतर- एक.

"जिल्ह्यासह महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकालात महायुतीने सर्वाधिक जागा मिळवीत यश संपादन केले आहे. या यशात तळागळातील कार्यकर्ते, सर्वसामान्य मतदार यांचा सिहांचा वाटा आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे." -गुलाबराव पाटील, पालकमंत्री, शिवसेना शिंदे गट नेते, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT