मेहुणबारे (जि. जळगाव) : बहिणीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने तिच्या सासऱ्याच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केला होता. याबाबत मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या खून प्रकरणातील मुख्य संशयिताला रविवारी (ता. १८) चाळीसगाव बसस्थानकातून ताब्यात घेतले. तर आणखी एका संशयिताला सोमवारी (ता. १९) सकाळी अटक केली. दोन्ही संशयितांना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावली. (Main suspect arrested in Mehunbare murder case 2 persons detained Jalgaon Crime News)
हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
मेहुणबारे (ह. मु. तिरपोळे) येथील दगडू वामन खैरनार (गढरी, वय ५२) यांचा मुलगा जगदिश याने तीन महिन्यांपूर्वी गावातील तरुणीला पळवून नेऊन तिच्याशी प्रेमविवाह केला होता. याचा राग मुलीचा भाऊ संशयित सचिन चव्हाण याला होता. या प्रेम प्रकरणावरून दोन्ही परिवारांमध्ये वादविवाद होऊन भांडणे झाली होती. त्यातून दगडू गढरी व त्यांच्या कुटुंबीयास दमबाजी झाली होती.
दगडू खैरनार हे शुक्रवारी (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास येथील रेशन दुकानातून रेशन घेऊन बसस्थानकाकडे येत असताना, दादा कोळी यांच्या घरासमोर संशयित सचिन चव्हाण याने दुचाकीवरून येत त्याच्या हातातील धारदार हत्याराने (धाऱ्या) दगडू खैरनार यांच्या मानेवर वार केला व ते हत्यार तेथेच टाकून तो पळून गेला होता. याबाबत दीपक दगा गढरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन चव्हाणच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक राजेंद्र सांगळे, गोरख चकोर, शैलेश माळी, जितूसिंग परदेशी यांनी संशियत सचिन चव्हाण (कोळी) याला रविवारी चाळीसगाव बसस्थानकावरून ताब्यात घेतले. तर आज सकाळी दुसरा संशयित सागर कोळी यालाही ताब्यात घेतले. दोघे संशयित नवेगाव मेहुणबारे येथे राहतात. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का, या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.