Man forgets pain with laughter esakal
जळगाव

Jalgaon News : हसण्याने माणूस वेदना विसरतो! हास्यसम्राट कोष्टी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : खळखळून हसण्याने माणसातील ताणतणाव नाहीसा होण्यास मदत होते. माणूस वेदना विसरतो. मनातील वेदनांवर फुंकर मिळते, असे प्रतिपादन हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांनी केले. (Man forgets pain with laughter jalgaon news)

येथील शेठ नारायण बंकट वाचनालयातर्फे आ. बं. हायस्कूलच्या प्रांगणात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर राजेश ठोंबरे, सहकार्यवाह मिलिंद देव, निमंत्रक मनीष शाह उपस्थित होते.

हास्यसम्राट कोष्टी यांनी जीवनात प्रत्येकाच्या ताणतणाव, समस्या आणि विवंचना असतात. मात्र, हास्यलकेर आयुष्यात उमटल्याने जगणे आनंददायी आणि सुखकर होते. त्यांच्या ‘गण्या’ या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून अजितकुमार कोष्टी यांनी रसिकांशी संवाद साधत खिळवून ठेवले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

यात कोरोना काळातील गंमतीजमती, नवऱ्याचा इरसालपणा, बसस्थानकावरील चमत्कारिक उद्‌घोषणा, प्रवासातील प्रासंगिक प्रयोग, बायकोचा संशयी स्वभाव, दैनंदिन जीवनातील, तसेच संसारातील उद्भवणारे विनोद, शाळेतील इन्स्पेक्शन आणि विद्यार्थ्यांच्या गंमतीजमती, मुलगी बघण्याचा कार्यक्रम, अशा अनेकविध विषयांवर अजितकुमार कोष्टी यांनी चुटके, गंमतीशीर किस्से, मार्मिक टीपणी करीत श्रोत्यांना मनमुराद हसविले.

वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मिलिंद देव यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. प्रा. मधुकर कासार यांनी सूत्रसंचालन केले. मनीष शाह यांनी आभार मानले. ज्येष्ठ संचालक वसंत चंद्रात्रे, प्रकाश कुलकर्णी, दीपक शुक्ल, विश्वास देशपांडे, रजनी बुंदेलखंडी, रसिक व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT