Maratha warrior Manoj Jarange Patil speaking at a meeting on Bhusawal Chauphuli. Members of society present in front.  eSakal
जळगाव

Manoj Jarange Patil: आरक्षणप्रश्नी आता मागे हटणार नाही : मनोज जरांगे-पाटील

Reservation issue will not retreat now: Manoj Jarange-Patil...

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या एकजुटीमुळे आपले आरक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख नोंदी सापडल्या आहेत. आरक्षण मिळाले तर आयुष्याची भाकरी मिळणार आहे. मी मराठ्यांच्या लेकरांसाठी जिवाची बाजी लावली. आता ही संधी असून, संधीचे सोने करा.

आरक्षण कुणी घरी आणून देणार नाही, त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून अनेक जण षडयंत्र करीत आहेत. टोळ्या मराठ्यांच्या विरोधात आल्या, तरी मराठे उरून पुरतील. (Manoj Jarange Patil statement Reservation issue will not retreat now jalgaon news)

कोणी काही केले तरी चिंता करू नका, मी खंबीर आहे, जीव गेला तरी एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील येथील सभेत दिला. भुसावळ रोड चौफुलीवर सोमवारी (ता. ४) सकाळी साडेअकराला ही सभा झाली. दरम्यान, भुसावळ व मुक्ताईनगर येथेही त्यांच्या सभा झाल्या. येथे जळगाव रोडवरून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिलांनी त्यांचे औक्षण केले तर शेतकरी दाम्पत्यांनी त्यांचा सत्कार केला. ते म्हणाले, मराठा आरक्षण ओबीसीमधून देण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार आम्ही वेळ दिलेला आहे. मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात तुम्हीच सांगितले होते, मग गुन्हे का मागे घेतले जात नाही. मुस्लिम, धनगर, बंजारा, सुतार, जामनेर तालुका पत्रकार मंच यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.

अन्याय केल्यास जड जाईल

मंत्री गिरीश महाजन यांच्या सरसकट आरक्षण देता येत नाही, या वक्तव्यावर जरांगे पाटील म्हणाले,‘ तुम्ही या राज्याचे पालकत्व स्वीकारले, घटनेच्या पदावर तुम्ही बसलाय. सरकार म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल, हे लक्षात ठेवा. छगन भुजबळ यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली.

मराठ्यांसोबत धनगर, ओबीसी, दलित, मातंग, मुस्लिम, बंजारा अशा १८ पगड जातीचे समाजबांधव आहेत. मराठाही त्यांच्यासोबत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण मिळावे, तसेच गिरीश महाजन यांनी मराठ्यांना आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

मुक्ताईनगरात सभेत प्रहार

मुक्ताईनगर : खानदेशातील अनेक मराठा बांधवांना आरक्षण आहे. परंतु आम्हाला आरक्षण नाही. त्यामुळे राज्यातील मराठा संकटात असून, हीच योग्य वेळ आहे, आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या मदतीला येण्याची. आपण सर्व समाजबांधवांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुक्ताईनगर सोमवारी येथे केले.

ते म्हणाले, २४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. यात कुठली शंका ठेवू नका. सरकारने तसा शब्द घेऊन त्या संदर्भात आश्वासनही दिलेले आहे. येवल्याचा एक नेता जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपण खंबीर आहोत.

भुसावळला जंगी स्वागत

येथील जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीजवळ सोमवारी (ता. ४) मनोज जरांगे पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोनला त्यांचे आगमन झाले. अनेक गाड्यांचा ताफा घेऊन आलेल्या पाटलांवर फुलांची उधळण करुन महिलांनी औक्षण केले. हजारो मराठा बांधव उपस्थित होते. ढोल ताशे व शिवरायांच्या पोवाड्यांनी वातावरण शिवमय झाले.

सर्व प्रथम कारगिल युद्धात शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन व्यासपीठावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. नंतर सकल मराठा समाज व खानदेश कुणबी समाजातर्फे भलामोठा हार घालून स्वागत केले गेले. महिला भगिनीही उपस्थित होत्या. ज्ञानेश्र्वर आमले व आनंदा ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. मराठा समाजाने कुठल्याही नेत्याच्या नादाला लागू नये, हे लोक आपल्यात फूट पाडतील. त्यांच्यापासून चार हात लांब राहा, सर्व बाजूंनी खंबीर आहोत, एकजूट करा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT