Mahatma Phule Jan Arogya Yojana sakal
जळगाव

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

ही योजना सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरतेय.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरतेय. या रुग्णालयात कमी उत्पन्न असणाऱ्यांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया केल्या जात आहे. रुग्णांना अत्याधुनिक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहेत. १ जानेवारी ते २४ जून दरम्यान एकूण ८०४ रुग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाले आहेत. याद्वारे रुग्णांचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. (Mahatma Phule Jan Arogya Yojana)

पूर्वी जिल्हा रुग्णालयातील सेवा, सुविधांचा दर्जा योग्य नव्हता. ‘आंधळं दळतेय आणि कुत्रं पीठ खातयं’ अशी रुग्णालयाची अवस्था होती. आता मात्र डीन म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यापासून रुग्णालयाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. स्वच्छता, टापटीप, रुग्णांना अत्याधुनिक प्रकारच्या मशिनद्वारे सेवा दिल्या जात आहेत. यामुळे जिल्हा रूग्णालयात येऊन उपचार घेणे, शस्त्रक्रिया करणे, औषधोपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढलेला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडे शासकीय दराने शस्त्रक्रियेसाठीही पैसे नसतात. अशावेळी जर त्यांच्याकडे बीपीएल कार्ड, केशरी कार्ड असेल तर त्यांच्यावर झालेला खर्च महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून केला जातो. यात रुग्णाला खर्च येत नाही. मात्र योग्य ती कागदपत्रे सादर करावी लागतात. एक जानेवारी २०२२ पासून आजअखेरपर्यंत ८०४ रुग्णांना या योजनेतून लाभ देण्यात आला आहे.

अपेंडिक्स, हर्निया आदी प्रकारच्या शस्त्रक्रिया १८५ रूग्णांवर करण्यात आल्या आहेत. विषबाधा, सर्पदंश (व्हेंटिलेटरवरील), डायलिसिस, कोविड बाधित, कोविड संशयित आदी १८६ रुग्णावर या योजनेअंतर्गत औषधोपचार करण्यात आला आहे. नवजात शिशूसंबंधित आजार, निमोनिया, डेंगी, नेफ्रोटिक सिंड्रोम, स्टेटस एपिलेप्टिकस, डबेटिस केटोआसिडोसिस आदी व्याधीच्या रुग्णावर उपचार झाले असून हाडांच्या विविध शस्त्रक्रिया, स्त्रीरोगविषयी विविध शस्त्रक्रिया, म्युकरमायकोसिसचे रुग्ण, जळीत व्यक्तीवर उपचार करून त्यांना ठणठणीत बरे केले आहे. जीएमसीचे अधिष्ठाता तथा महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, योजनेचे वैद्यकीय समन्वयक डॉ. डॅनियल साजी, डाटा एंट्री ऑपरेटर माधुरी पाटील, अभिषेक पाटील, तेजस वाघ, संदीप माळी काम करतात.

आकडे बोलतात...

* विविध शस्त्रक्रिया - १८५

* औषधोपचार - १८६

* नवजात शिशू व बालके - २९८

* हाडांच्या विविध शस्त्रक्रिया - ५०

* स्त्रीरोगविषयी विविध शस्त्रक्रिया - १७

* म्युकरमायकोसिस -- ५०

* जळीत केसेस- १८

''पिवळे, केशरी कार्डधारकांवर या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात. यामुळे या रुग्णांचा मोठा खर्च वाचतो. रुग्णालयात अत्याधुनिक प्रकारच्या सुविधा, सोय पुरविल्या गेल्याने रुग्णांचा कल शासकीय रुग्णालयातील सेवा घेण्याकडे वाढला आहे.'' - डॉ. डॅनियल साजी, योजनेचे वैद्यकीय समन्वयक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT