Jalgaon News : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात शनिवारी (ता. २७) सर्व मागण्या मान्य केल्यानंतरही प्रशासनाने सुरू केलेले मराठा व अन्य संबंधित वर्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे.
रविवारपर्यंत जिल्ह्यातील पाच लाखांवर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले, त्याची एकूण कुटुंबाच्या संख्येशी टक्केवारी ६३ टक्क्यांवर आहे. (maratha survey campaign in jalgaon district is in full swing news)
काही दिवसांपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात हालचाली गतिमान झाल्या होत्या. मनोज जरांगे-पाटलांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतर कुणब्यांच्या नोंदी शोधण्याची मोहीम राज्यभर सुरू झाली. जळगाव जिल्ह्यातही अशा लाखावर नोंदी मिळून आल्यात.
त्यानंतरच्या टप्प्यातही आंदोलन शांत झाले नाही व जरांगेंनी मुंबईत आंदोलनाचा हुंकार फुंकला. त्यानुसार त्यांनी आंतरवाली सराटीतून पायी मार्च काढला व तो मुंबईत धडकण्याच्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या.
गेल्या आठवड्यापूर्वी सरकारने आदेश काढत जिल्हानिहाय मराठा व अन्य समाजाच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली.
त्यानुसार गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सर्वेक्षणाबाबत सूचना दिल्या. त्याअंतर्गत प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्ह्यात प्रभावी काम
जळगाव जिल्ह्यातील प्रगणकांनी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले. त्यानुसार कामही सुरू झाले. रोज किती कुटुंबांचे सर्वेक्षण करायचे, त्यासंबंधी उद्दिष्ट ठरविण्यात आले. तालुकानिहाय कामास सुरवात झाली. पैकी सर्वांत प्रभावी काम पारोळा तालुक्यात होत असून, त्याठिकाणी जवळपास ९७ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
प्रगणकांना येताहेत अडचणी
या सर्वेक्षणाबाबत जिल्हा प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती केली असली तरी अद्यापही बहुतांश नागरिकांना अशा प्रकारचे सर्वेक्षण सुरू झाले आहे, याची माहिती नाही. त्यामुळे प्रगणकांना व सर्वेक्षणात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येक घरी गेल्यानंतर संबंधित कुटुंबातील सदस्याकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही जण सहकार्य करीत नसल्याचीही कर्मचाऱ्यांची भावना आहे.
शहरी भागात धीम्या गतीने
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात धीम्या गतीने हे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणाची टक्केवारी अवघी २२.७२ एवढी आहे. पालिका क्षेत्रातील सर्वेक्षण करावयाच्या कुटुंबांची संख्या एक लाख ५७ हजार ६५० असताना आतापर्यंत केवळ ३५ हजार ८२२ कुटुंबांचेच सर्वेक्षण होऊ शकले आहे.
तालुकानिहाय सर्वेक्षण असे
तालुका----- सर्वेक्षण करावयाच्या--- सर्वेक्षण झालेली कुटुंब---- टक्केवारी
------------कुटुंबांची संख्या
अमळनेर----- ४४२६२-------------३०५९२---------६९.१२
भडगाव-------३३०००-------------२६८५६--------८१.३८
भुसावळ-------३६५९५------------३०२५१--------८२.६६
बोदवड--------१५६४६-----------७७७४----------४९.६९
चाळीसगाव-----९६०००-----------७३२६१---------७६.३१
चोपडा----------५२२२१----------३०२२२----------५७.८७
धरणगाव-------३४४००----------२१६२५--------६२.८६
एरंडोल---------२७०९०----------७७६५----------२८.६६
जळगाव--------४३४६४----------३५००७--------८०.५४
जामनेर---------७००००-----------५४७४६-------७८.२१
मुक्ताईनगर------४००००----------३३६०५--------८४.०१
पाचोरा---------४५९६१-----------४४६२८--------९७.१०
रावेर-----------६१७०------------४३१२८--------८१.६२
एकूण----------६४२३५९--------४७३७३९--------७३.७५
पालिका-----१५७६५०--------३५८२२---------२२.७२
------
एकूण ----८०००००९--------५०९५६१-------६३.६९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.