जळगाव : महापालिका प्रशासनाकडे तगादा लावूनही साधी सफाईची कामे होत नसल्याने जनताच नव्हे, तर नगरसेवकही त्रस्त आहेत. मात्र त्यातून जनहित साधत भाजप सदस्य जितेंद्र मराठे यांनी स्वत:चीच यंत्रणा कामाला लावून प्रभाग तेरामध्ये स्वच्छता अभियान सुरू केले आहे.
वर्षभर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो, तो दिवाळीचा सण तोंडावर आहे. दिवाळीला घराघरांत साफसफाईची कामे हाती घेतली जातात; परंतु सभोवतालचा परिसर स्वच्छतेची जबाबदारी ज्या महापालिका प्रशासनाकडे आहे, ती यंत्रणा सुस्त असून, दररोज रस्त्यांमधील खड्ड्यांबरोबरच स्वच्छतेच्याही तक्रारी समोर येत आहेत. वारंवार तक्रारी करून, अगदी नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही ही कामे मार्गी लागत नाहीत.(Marathe became sanitation worker Cleaning in ward by own system on occasion of Diwali work by 35 workers Jalgaon News)
स्वत:च्या यंत्रणेतून काम
असे असले तरी आहे त्या स्थितीवर रडत बसून, महापालिका यंत्रणेल दोष देण्यापेक्षा स्वत:ची यंत्रणा कामाला लावून आपल्या प्रभागाची साफसफाई करण्याचा विडा प्रभाग क्रमांक १३ मधील सदस्य जितेंद्र मराठे यांनी उचलला आहे. त्यातून त्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभागात स्वच्छता अभियान सुरू केले आहे.
अशी यंत्रणा कामाला
प्रभाग क्रमांक १३ मध्ये दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत मराठेंच्या यंत्रणेतून जवळपास ३० ते ३५ कामगार झाडू मारणे, गटार काढण्यासह परिसरातील खुल्या जागा, खुले प्लॉट व रस्त्याच्या कडेला असलेले गवत, झुडपे काढण्याचे काम करत आहेत. १५ ऑक्टोबरपासून हे अभियान सुरू झाले असून, पूर्ण प्रभाग स्वच्छ होईपर्यंत काम सुरू राहणार आहे. मराठेंचा हा उपक्रम प्रभागासह शहरातही कौतुकाचा विषय ठरतोय.
"दिवाळीला आपण आपले घर जसे स्वच्छ करतो, वर्षभरातील घाण-कचरा, भंगार काढून टाकतो. त्याचप्रमाणे प्रभागाची स्वच्छता करण्याचे आम्ही ठरविले. केवळ महापालिका यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वत:ची यंत्रणा लावून हे काम सुरू केले आहे."
-जितेंद्र मराठे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.