covid center 
जळगाव

कोविड सेंटरमधून १७ रुग्णांचे पलायन 

सुरेश महाजन,

जामनेर (जळगाव) : कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाने तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील कोविड सेंटर पुन्हा सुरू केले. मात्र, या सेंटरमध्ये सुविधाच मिळत नसल्याची ओरड करत येथील कोरोनाबाधित रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. हे रुग्ण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यातील १७ रुग्णांनी चक्क रुग्णालयातून पलायन केले. हा गंभीर प्रकार सोमवारी (ता. १५) सकाळी घडला. 
पळासखेडे बुद्रुक येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना निदान झालेल्या रुग्णांना दाखल करून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी सध्या ५७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, सोमवारी (ता. १५) सकाळी दाखल रुग्णांनी स्वच्छतेसह सोयी-सुविधांच्या नावाखाली गोंधळ घालायला सुरवात केली. या घटनेची माहिती मिळताच नोडल अधिकारी तथा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनय सोनवणे कोविड सेंटरमध्ये पोचले. त्यांनी सर्व रुग्णांना आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक रुग्ण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. डॉ. सोनवणे यांनी सांगूनही रुग्णांचे समाधान झाले नाही. त्यानंतर डॉ. सोनवणे यांची पाठ फिरताच तब्बल १७ रुग्णांनी कोविड सेंटरमधून चक्क पलायन केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात सायंकाळी तातडीची बैठक झाली. त्यात तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, डॉ. विनय सोनवणे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजेश सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते. या रुग्णांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेसह आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, काही दाखल रुग्णांना पाचव्या दिवशीच सुटी पाहिजे. मात्र, नियमानुसार सुटी करता येत नाही. विद्यमान परिस्थितीत काही रुग्णांनी कोविड सेंटरमधून पलायन केले आहे. 
- डॉ. विनय सोनवणे, नोडल अधिकारी, जामनेर  

संपादन ःराजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT