no mask use 
जळगाव

अमळनेर येथे मास्क अनिवार्य; विनामास्क वाल्यावर कार्यवाहीचा बडगा

प्रा.हिरालाल पाटील

अमळनेर (जळगाव) : सद्यस्थितीत राज्यात सर्वत्र कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याची अंमलबजावणीसाठी अमळनेर शहरात विना मास्क वाल्यांवर कारवाईचा बडगा सुरू केला आहे.
रस्‍त्‍यावरून येणााऱ्या जाणाऱ्या नागरीकांसह सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये मालक व ग्राहकांमध्ये तसेच ग्राहकांमधील अंतर कमीत कमी सहा फुटाचे अंतर असणे बंधनकारक आहे. एका वेळेस जास्तीत जास्त पाच व्यक्तींनाच परवानगी दिली पाहिजे. घराबाहेर पडतेवेळी सर्वांना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक कामाच्या ठिकाणी थुंकण्यास पूर्ण पणे बंदी आहे. असे आढळून आल्यास त्यांचेवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यावेळी म्हणाले. अमळनेर तालुक्यातील जनतेने अनावश्यक बाजारात गर्दी करू नये,आवश्यक असल्यास घराबाहेर पडा अन्यथा घरात रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहनही यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी केले.

लग्‍नसमारंभात तुफान गर्दी
लग्न समारंभ व अंत्यविधी तसेच इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही. अशी बाब आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय चालक नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे आदेश काढण्यात आले आहेत. तरी देखील आज होणाऱ्या सर्वच लग्‍नांना मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळत आहे. 

वाहनांना अडवून तपासणी
बऱ्याच दिवसांपासून लोक बेफिकरीने विना मास्क फिरत होते. मात्र पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या तपासणीने धावपळ उडाली होती. तर बऱ्याच विनामास्क वाल्यांकडुन दंड वसुलही करण्यात आल्याने यामुळे शिस्त पालनाची अंमलबजावणी लोक करतील असेही जाणकार लोकांमध्ये चर्चा होती.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT